वय झालं? छे छे SS, ७३ व्या वर्षीही 'ते' लढवताहेत निवडणूक; नावावर आहे 'अजिंक्य' राहण्याचा रेकॉर्ड

haridwar khadake from savargaon elect election at age of 73 in yavatmal
haridwar khadake from savargaon elect election at age of 73 in yavatmal

यवतमाळ : एखाद्या व्यक्तींच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी राहते. इतके प्रेम करते की, तुम्हाला निवडणुकीत अपराजित ठेवते. असेच प्रेम तालुक्‍यातील सावरगड येथील हरिद्वार खडके यांना मिळाले आहे. आज त्यांचे वय 73 वर्षे आहे. गेल्या 1972पासून त्यांनी पाच पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुका लढविल्या आणि प्रत्येक निवडणुकीत ते अपराजित राहिलेत. सरपंच, उपसरपंच, अशी पदे त्यांच्या वाटेला आलटून पालटून आली आहेत. यंदा वयाच्या ७३ व्या वर्षीही ते निवडणूक लढवित आहेत. 

खडके यांनी 1972 मध्ये पहिली निवडणूक लढविली आणि जिंकून येत ते सत्ताधारी बनले. त्यांनतर गावाच्या राजकारणात त्यांनी कधीच मागे वळून बघितले नाही. घाटंजी मार्गावरील सावरगड या छोट्याशा गावात नऊ ऑगस्ट 1948ला जन्म झाला. आईवडील मजुरी करायचे. त्यामुळे कौटुंबिक परिस्थिती बेताचीच. परिणामी आठवीपर्यंतच ते शिक्षण घेऊ शकले. हरिद्वार खडके यांनी 1972मध्ये पहिल्यांदा यांना सावरगड ग्रामपंचायतीच्या आखाड्यात उतरविले.

पहिल्या प्रयत्नातच खडके हे विरोधकावर मात करीत मताधिक्‍याने निवडून आलेत. ते सावरगड ग्रामपंचायतीचे उपसरपंच झाले. त्यानंतर मात्र, खडके यांनी कधी मागे वळून बघितलेच नाही. गावाचा विकास साधत सावरगड ग्रामपंचायतीच्या प्रत्येक निवडणुकीत ते निवडून आलेत. त्यातूनच त्यांनी 1972 ते 2020 या कालावधीत तब्बल 20 वर्षे सरपंच, 15 वर्षे उपसरपंच आणि दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य अशी 45 वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून राजकीय कारकीर्द गाजविली. निवडणूक कोणतीही असो, विजयाची माळ खडके यांच्या गळ्यात पडली पाहिजे, असे समीकरण तयार झाले. पाच पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी विजय मिळविला आहे. ग्रामपंचायतची कामे असो की, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय कुठेही खडके अगदी एखाद्या तरुणाप्रमाणे येतात. त्यामुळे ते  गावकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.

पहिल्यांदा निवडणूक लढवली. तेव्हापासून एकही निवडणूक हरली नाही. माझ्या दिवसाची सुरुवात गावकऱ्यांच्या समस्येपासून होते. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कोणत्याही कार्यालयांत जातो. दीर्घ कालावधीत गावाचा विकास करण्यावर भर दिला. प्रामाणिक काम करण्याला प्राधान्य दिले की, जनतेचे प्रेमही मिळते, हे मी अनुभवले आहे.
- हरिद्वार खडके, माजी सरपंच, उपसरपंच, सावरगड (जि. यवतमाळ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com