स्वगृही यायची घाई, तपासणीचा पत्ताच नाही

train.jpg
train.jpg

अकोला : ‘कोराना व्हायरस’ने जगभरात थैमान घातल्यामुळे विदेशातून तसेच मोठ्या शहरातून स्वगृही परतणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामध्ये रेल्वे व बसद्वारे देशांतर्गत परतीचा प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. परंतु, रेल्वे स्थानक तसेच बसस्थानकांवर ‘कोरोना’ डिटेक्शन संदर्भात तपासणीची सुविधाच नसल्याने, कोरोना बाधित रुग्णांचा शोध मोठे आव्हान ठरणार आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसला रोखण्यात आतापर्यंत भारताला मोठ्या प्रमाणात यश आले आहे. महाराष्ट्र सरकारद्वारे सुद्धा सर्वोपरी उपाययोजना केल्या जात असून, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विविध माध्यमांद्वारे जनजागृती केली जात आहे. वैद्यकीय सुविधा प्रदान केल्या जात असून, योग्य ती खबरदारी घेण्यासाठी जिल्हा स्तरावर निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना बाधित किंवा संशयित रुग्णांचा शोध घेण्यासाठी विमान स्थळांवर वैद्यकीय तपासणी केली जाते. परंतु, रेल्वे, एसटी, खासगी बसद्वारे सुद्धा हजोरो विद्यार्थी, कर्मचारी, मजूर मोठ्या तसेच कोरोना रुग्ण आढळलेल्या शहरातून स्वगृही परतत आहेत. मात्र त्यांच्या तपासणीसाठी रेल्वे स्थानक, बस स्थानक किंवा खासगी बस स्थानकांवर कोणतीही तपासणी सुविधा अजूनप्रर्यंत उपलब्ध नसून, हा चिंतेचा विषय ठरू शकतो.

लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी स्वतः तपासणी करुन घ्यावी
एसटी किंवा खासगी बस सेवेद्वारे प्रवास करणाऱ्यांची, स्थानकांवर वैद्यकीय तपासणी करण्याबाबत अद्याप प्रावधान नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनेबाबत विविध माध्यमांद्वारे जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. प्रवाशांनी स्वतः सतर्कता बाळगून खोकला, ताप, सर्दी असल्यास वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी, याबाबत जिल्हा प्रशासनाद्वारे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.
- जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी, अकोला

रेल्वेद्वारे सुविधा प्रदान करण्याची शक्यता
रेल्वे प्रशासनाद्वारे ‘कोरोना प्रतिबंध’ विषयांतर्गत जनजागृती केली जात आहे. परंतु, रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या वैद्यकीय तपासणी संदर्भात वरिष्ठ स्तरावरुन अजूनपर्यंत कोणतेही निर्देश किंवा सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत. मात्र तशी सुविधा रेल्वे प्रशासन उपलब्ध करुन देण्याची शक्यता आहे.
- अरुण नांदूरकर, स्टेशन प्रबंधक, अकोला

स्थानकांवर जनजागृती व वाहकांकडे सॅनिटायझर्स देऊ
एसटी प्रवाशांच्या वैद्यकीय तपासणीसाठी अजूनपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून कोणते निर्देश किंवा वैद्यकीय तपासणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. ‘कोरोना’ संसर्ग टाळण्यासाठी बसस्थानकांवर जनजागृती केली जात आहे. लवकरच वाहकांकडे सॅनिटायझरर्स दिले जाणार असून, बसस्थानकांवर जनजागृतीपर फलके लावण्यात येणार आहेत.
- स्मीता सुतवाने, विभागीय वाहतूक अधिकारी, अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com