परीक्षा होतील, पण दर्जाचे काय? महाविद्यालयीन परीक्षा विद्यापीठीय कशा

how standard can be maintain during college level exams
how standard can be maintain during college level exams

यवतमाळ : तब्बल चार वेळा परीक्षा घेण्यात अपयशी ठरलेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आता महाविद्यालयीन स्तरावर परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. मात्र, महाविद्यालयीनस्तरावरील परीक्षांना विद्यापीठीय परीक्षांचा दर्जा मिळेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात वरपास झाल्याचा शिक्का बसण्याची शक्‍यता या नियोजनामुळे बसण्याची शक्‍यता आहे. विद्यापीठाने मात्र, "यूजीसी'च्या मार्गदर्शक तत्त्वावानुसारच परीक्षा होत असल्याचा हवाला देत ही शक्‍यता फेटाळली आहे.

संपूर्ण सत्र महाविद्यालयात अभ्यास केल्यानंतर विद्यापीठीय परीक्षा घेतल्या जातात. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी समान पेपर दिला जातो. त्यामध्ये समानता असते. त्यामुळे या परीक्षांना विशेष दर्जा असतो.

महाविद्यालयस्तरावर घेण्यात येणाऱ्या परीक्षांना तो दर्जा मिळेल का, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. यंदा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने महाविद्यालयांनाच पेपर सेट करून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास सांगितले आहे. 

दोन नोव्हेंबरपर्यंत परीक्षा आटोपायच्या आहेत व पाच नोव्हेंबरपर्यंत गुणदान करून विद्यापीठाला पाठवायचे आहेत. आठ नोव्हेंबरपासून निकालही लावायचे आहेत. विद्यापीठाशी 386 महाविद्यालये संलग्नित असून 50 हजार विद्यार्थी परीक्षांना सामोरे जाणार आहेत. अनुशेषातील 20 हजार विद्यार्थ्यांना होम असायमेंटच्या माध्यमातून परीक्षा द्याव्या लागणार आहेत. सर्व महाविद्यालयांतून एकाच विषयाचे भिन्न पेपरसेट तयार होणार आहेत. त्यात समानता राहणार नाही. त्यामुळे ही परीक्षा कशी म्हणायची? असा आक्षेप घेण्यात आला आहे.

दरवर्षी विद्यापीठ परीक्षा घेत असले तरी महाविद्यालयेच ती प्रक्रिया पार पडत असतात. महाविद्यालयीन पातळीवर इंटरनल व प्रात्यक्षिक परीक्षेसह असायमेंट घेतल्याच जातात. त्या परीक्षा महाविद्यालयातील शिक्षकच घेतात, तेच पेपर काढतात व मूल्यांकनही करतात. "यूजीसी'च्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच या परीक्षा होत आहेत. त्यामुळे दर्जा घसरणार नाही, या परीक्षांनाही विद्यापीठीय परीक्षांचाच दर्जा राहणार आहे. त्यामुळे चिंता करू नये. विद्यापीठाकडे पेपरसेट असले तरी ते विद्यापीठाचा आवाका बघता सर्व महाविद्यालयांना एकाचवेळी पोहोचविणे अशक्‍य होते. त्यामुळे महाविद्यालयीन पातळीवर ही व्यवस्था करण्यात आली आहे.
-डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलगुरू,
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.

परीक्षा घेण्यासाठी एजन्सी नियुक्त करताना काटेकोर परीक्षण करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी तांत्रिक दोष उद्‌भवल्याने परीक्षांमध्ये गोंधळ उडाला. त्याचा फटका विद्यापीठाला बसला व विद्यार्थ्यांनाही मानसिक त्रास सहन करावा लागला त्याचे शल्य आहे, आता केलेल्या पर्यायी व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार असून, कुणीही वंचित राहणार नाही.
- डॉ. हेमंत देशमुख, 
परीक्षा नियंत्रक, अमरावती विद्यापीठ.


संपादन - अथर्व महंकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com