धक्कादायक प्रकार! अवैधरित्या खणली अख्खी खाण; कोट्यावधी रुपयांचे खनिज लंपास; वाचा काय घडला प्रकार 

Illegal digging of mine in Chandrapur District
Illegal digging of mine in Chandrapur District

चंद्रपूर : प्रशासनाने चौकशी केली. त्यात अनेक धक्कादायक बाबी आढळल्या. मात्र कोरोनाचे कारण सांगून स्थानिक अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेली. याचा फायदा घेत तस्करांनी नागभीड तालुक्‍यातील वाढोणा येथे अक्षरशः: विनापरवानगी खाणच खोदली. लाखो ब्रास गिट्टी(पांढरे दगड) चोरून नेले. ते रस्त्याच्या कामात वापरले. तालुक्‍यातील एका बड्या राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने कोट्यवधी रुपयांचे गौण खनिजाची लूट सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या डोळ्यावरची झोप मात्र अद्याप उघडली नाही.

नागभीड तालुक्‍यात गावखेड्यात रस्त्याची काम सुरू आहे. याकामासाठी गिट्टी, मुरूमांची आवश्‍यकता आहे. मात्र परवानगी न घेताच एका कंपनीने वाढोणा गावाजनकीच्या गट क्रमांक 383 मध्ये उत्खनन सुरू केले. याची तक्रार भूविज्ञान व संचालनालयाकडे करण्यात आली. त्यानंतर 17 जानेवारी 2020 रोजी चंद्रपुरातील भूविज्ञान व खनिकर्म कार्यालयातील वरिष्ठ उपसंचालकांच्या पथकाने मोक्का चौकशी केली. 

तेव्हा या ठिकाणी एक मोठी खाण आढळली. दगड फोडण्यासाठी इथे क्रेशर होते. या खाणीवरील वेब्रीजचे चालक कोमपल्ली महेंद्र या पथकाच्या हाती लागले. मात्र ते परप्रांतीय असल्याने त्याला स्थानिक भाषा येत नव्हती. त्यामुळे त्याने अधिकाऱ्यांशी बोलण्यास नकार दिला. त्यांच्याकडे खनिज वाहतूक पासेस पुस्तक सापडली. त्यावर नागभीड तहलीदाराचे शिक्का मारलेले होते. याशिवाय वाहतूक पासेस पुस्तकावर गट क्रमांक, परवाना आदेश क्रमांक, कंपनीचे नाव आदी काहीच तपशील नमूद नव्हता. 

मात्र त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन आणि क्रशिंग केलेल्या गिट्टीचा मोठा साठा आढळून आला आहे. याची परवानगी जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्याकडे असल्यास या कार्यालयास माहिती पुरवावी. जेणेकरून परवानगी पेक्षा अधिक किंवा अवैध स्वामित्वधन दंडाची रक्कम वसूल करता, येईल असा अहवाल उपसंचालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. 

अद्याप त्याचे उत्तर आलेले नाही. मतदार संघातील एका मोठ्या राजकीय नेत्याचा दबाव आहे. त्यामुळे अधिकारी कारवाई करण्यास घाबरत आहे. कोरोनाचे कारण सांगून आतापर्यंत अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेली. आता खाण बुजवून पुरावे नष्ट करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप मनसेचे तालुका अध्यक्ष बंडू गेडाम यांनी पत्रकार परिषदेत केला. यासंदर्भात नागभीडचे तहसीलदार मनोहर चव्हाण यांची प्रतिक्रिया प्राप्त होऊ शकली नाही.

"स्वस्तीनो प्रोजेक्‍ट'ला कुणाचा आशीर्वाद

भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय पथकाच्या मोक्का चौकशीनंतर फेब्रुवारी महिन्यात मनसेचे तालुका प्रमुख बंडू गेडाम यांनी माहितीच्या अधिकारात यासंदर्भात माहिती मागितली. तेव्हा वाढोणा येथील गट क्रमांक 383 मधून गिट्टी उत्खनन करण्यासाठी "स्वस्तीनो प्रोजेक्‍ट" या कंपनीला सन 2018 ते 2020 पर्यंत कोणत्याही प्रकारच्या उत्खनाची परवानगी दिली नाही, असे तहसीलदारांनी स्पष्ट केले. संबंधित उत्खनन स्वस्तीनो प्रोजेक्‍ट या कंपनीकडून केले जात आहे. तालुक्‍यात बांधकाम सुरू असलेल्या रस्त्यांवर या गिट्टीचा वापर केला जात आहे. यात शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com