esakal | जुळ्या शहरांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; अचलपूर-परतवाड्यात चोरीच्या घटना वाढल्या 
sakal

बोलून बातमी शोधा

Incidents of theft are increasing in Achalpur and paratwada in Amravati

परतवाड्याच्या जगदंब चौकातील गावंडे ज्वेलर्समधून चोरट्यांनी 97 हजार रुपयांचे मंगळसूत्र पळविले. दुकानाचे मालक नीलेश बाबाराव गावंडे यांनी या घटनेची तक्रार परतवाडा पोलिस ठाण्यात नोंदविली आहे.

जुळ्या शहरांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; अचलपूर-परतवाड्यात चोरीच्या घटना वाढल्या 

sakal_logo
By
राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) ः जुळे शहर असलेल्या अचलपूर व परतवाड्यात चोरटे सक्रिय झाले असून गेल्या 24 तासांत येथे चार चोरीच्या घटना घडल्या. तब्बल दोन लाखांवर रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. 

परतवाड्याच्या जगदंब चौकातील गावंडे ज्वेलर्समधून चोरट्यांनी 97 हजार रुपयांचे मंगळसूत्र पळविले. दुकानाचे मालक नीलेश बाबाराव गावंडे यांनी या घटनेची तक्रार परतवाडा पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. दररोज काम आटोपल्यावर रात्री नऊ वाजता ते दिवसभराच्या व्यवहाराचा हीशेब करीत असतात. यासोबतच दुकानातील मालाची देखील तपासणी करण्यात येते. या तपासणीत 97 हजार रुपयांचे मंगळसूत्र बेपत्ता झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरद्ध गुन्हा दाखल केला.

हे वाचाच - सुशील-कुणालची ‘सुपारी किलींग’? नागपुरात संशयातून दुहेरी हत्याकांड; गॅंगवॉर भडकण्याची शक्यता

चोरीची आणखी एक घटना बसस्टॅण्ड समोरील शिवकुमार अग्रवाल यांच्या दुकानात घडली. चोरट्यांनी खिडकीतून हात टाकून दहा साड्यांचे गठ्ठे पळविले. त्यात 50 साड्या होत्या व त्यांची किंमत 50 हजार रुपयांच्या घरात असल्याचे त्यांनी परतवाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. 

इन्फ्राटेक्‍चर कंपनीच्या माध्यमाने तसेच बांधकाम विभागातर्फे परतवाड्यात समाजकल्याण हॉस्टेलचे काम सुरू आहे. बांधकामाच्या ठिकाणी असलेला चौकीदार दिवाळीच्या निमित्ताने सुटीवर गेला असता चोरट्यांनी येथील बांधकाम सामग्री व लोखंड, असा 20 हजार रुपयांचा माल पळविला. देवधन खंडारे यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

नक्की वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

चोरीची आणखी एक घटना अचलपूरच्या हिरापुरा येथे घडली. धनराज नारायण चरपे यांनी त्यांचे वडिलोपार्जित घर शिकस्त झाल्याने ते पाडून नवीन घर बांधले. दिवाळीच्या एक दिवस आगोदर शेजारी तसेच नातेवाइकांकडे ठेवलेले सामान त्यांनी नव्या घरात आणले. लक्ष्मी पूजनासाठी ठेवलेले 22 हजार रुपये, पत्नीचे सोन्याचे दागिने, चांदीच्या तोरड्या, तसेच कागदपत्रे व एक पेटी, असा 43 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला. तक्रारीवरून अचलपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

संपादन - अथर्व महांकाळ