वारकरी संप्रदायाची महिती आता आॅनलाईन 

Information about Warkari sect is now online
Information about Warkari sect is now online

नागपूर  : मोबाईलच्या आजच्या युगात वारकरी संप्रदाय तरी कसा मागे रहील. तंत्रज्ञानाद्वारे वारकरी सांप्रदायाचा इतिहास, संतांचे ग्रंथ व त्यांचे विचार युवा पिढीसमोर आणण्याचे उद्दिष्ट ठेवून विश्व वारकरी सेवा संस्थेने ‘वारकरी विश्व’ नावाने मोबाईल ॲप व वेबसाईट विकसित केले. या मोबाईल ॲप व वेबसाईटचे लोगो अनावरण व ई-लोकार्पण (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे)
मंगळवारी (ता. २७ ) दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत करण्यात येईल.

‘वारकरी विश्व’ मोबाईल ॲप व वेबसाईटद्वारे वारकरी संप्रदायाचा हजारो वर्षाचा इतिहास, वारकरी परंपरा, वारकरी संत, वारकरी ग्रंथ तसेच भारत व भारताबाहेरील वारकरी सांप्रदायातील प्रत्येक घटकाची जसे कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार महाराज मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी, वीणेकरी, विठ्ठल-रखुमाई व वारकरी सांप्रदायातील संतांची मंदिरे, वारकरी शिक्षण संस्था, वारकरी सांप्रदायाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था आदींबाबत माहिती प्रकाशित व प्रसारित करण्यात येईल. 

विश्व वारकरी सेवा संस्थेच्या वतीने आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शांतिब्रह्म गुरुवर्य हभप मारोती महाराज कुऱ्हेकर (आळंदी) राहतील. उद्धाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे गृहमंत्री अनिल देशमुख राहतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हभप रामरावजी महाराज ढोक, चैतन्य महाराज देगलूरकर (पंढरपूर), श्रीनाथ पिठाधीश्वर आचार्य स्वामी श्री. जितेंद्रनाथ महाराज, श्रीदेवनाथ मठ (सुर्जी-अंजनगांव) जयवंत महाराज बोधले (पंढरपूर), श्रीरामपंत जोशी महाराज (नागपूर), संजय महाराज पाचपोर (अकोला), उमेश महाराज दशरथे (परभणी), पुरुषोत्तम दादा महाराज पाटील ( पुणे), जगन्नाथ महाराज पाटील ( मुंबई ), माधवीताई खोपडे (पंढरपूर) विश्वस्त श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर संस्थान, पंढरपूर, अभयजी टिळक ( पुणे ), संजय नाना महाराज धोंडगे (नाशिक), रवींद्र महाराज हरणे ( मुक्ताईनगर ), कान्होबा महाराज देहूकर ( देहू), योगीराज महाराज गोसावी (पैठण), पांडुरंगजी महाराज बारापात्रे (नागपूर), तुकाराम महाराज मुंढे (बीड), प्रमोद महाराज ठाकरे (नागपूर), अनिल महाराज अहेर (नागपूर), विशाल महाराज बढे (यवतमाळ) व वारकरी सांप्रदायातील इतर ज्येष्ठ महाराज व साहित्यिक मंडळी उपस्थित राहतील, अशी माहिती संदीप जिवलग कोहळे यांनी दिली.

संपादन  : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com