
गंभीर जखमी तरुणास प्रथम उपचारासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर नागपूरला हलविले. परंतु, गंभीर जखमी असलेल्या तरुणाचे शरीरापासून वेगळे झालेले दोन्ही पाय त्याच्यासोबत न पाठविता इर्विन मध्येच राहिले.
अमरावती : काटेपूर्णा धरणाच्या कामावर मजूर असलेल्या तरुणाच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. त्यात दुचाकीस्वार तरुणाचे दोन्ही पाय मांडीपासून वेगळे झाले. जखमी तरुणाची प्रकृती गंभीर असून प्राथमिक उपचारानंतर त्याला नागपूरला हलविण्यात आले. त्याचे दोन्ही पाय इर्विनच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.
हेही वाचा - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली
राजू नंदू सेलोकार (वय 20, रा. उमरला, झल्लार, मध्य प्रदेश), असे गंभीर जखमी तरुणाचे नाव असल्याचे लोणी पोलिसांनी सांगितले. काम आटोपल्यावर चार मजूर काटेपूर्णावरून दोन दुचाकीने अमरावतीला येत होते. मंगळवारी (ता. 12) रात्री महामार्गावरील हॉटेल आतिथ्य समोर मालवाहू ट्रकने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात राजू याच्या पायावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचे दोन्ही पाय मांडीपासून वेगळे झाले. त्याचा साथीदार किरकोळ जखमी आहे.
हेही वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं
गंभीर जखमी तरुणास प्रथम उपचारासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर नागपूरला हलविले. परंतु, गंभीर जखमी असलेल्या तरुणाचे शरीरापासून वेगळे झालेले दोन्ही पाय त्याच्यासोबत न पाठविता इर्विन मध्येच राहिले. थोड्या वेळाने डॉक्टर व पोलिसांपुढे जखमी तरुणाचे पाय ठेवायचे कोठे? हा प्रश्न निर्माण झाला. त्यावर पोलिस व जिल्हा शल्यचिकित्सकांमध्ये चर्चा झाली. अखेर तरुणांचे मांडीपासून वेगळे झालेले दोन्ही पाय सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात ठेवले आहेत, असे लोणी पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
हेही वाचा - हृदयद्रावक! खेळता-खेळता स्वयंपाकघरात पोहोचली, आई गंSSS ओरडली अन् सोडला जीव