बारा दिवसांची चिमुकली गंभीर आजाराने ग्रासलेली अन् घरात अठरा विश्व दारिद्र्य, मग काय करणार ते मायबाप

अनिल कांबळे
Tuesday, 15 September 2020

ओषण घेण्याच्या बहाण्याने दोघेही बाहेर पडले आणि पसार झाले. तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अजनी पोलिसांनी नियंत्रण कक्षाद्वारे यवतमाळ येथील पोलिसांना कळविले आहे. लवकरच नकोशी ठरलेल्या या चिमुकलीच्या आई-वडिलांना अटक होईल.

नागपूर : मंदा कासरकर (वय २५) आणि संतोष कासरकर (वय ३०) हे दोघेही पती-पत्नी... राहणार यवतमाळ जिल्ह्यातील खेडेगावातील पालाच्या झोपडीत... दोघेही हातमजुरी करतात... एक सप्टेंबरला मंदाला यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले... तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला... मात्र, जन्मानंतर बाळाला गंभीर आजार असल्याचे सांगण्यात आले... यामुळे दोघांनीही हा निर्णय घेतला... वाचा...

मंदाने गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र, डॉक्टरांनी बाळाला गंभीर आजार असल्याचे सांगितले. घरात अठरा विश्व दारिद्र्य असल्यामुळे खायची सोय नाही. अशात आजारी बाळाच्या उपचारासाठी पैसे कुठून आणायचे? असा प्रश्न आई-वडिलांना पडला.

सविस्तर वाचा - अमरावतीत विवाहितेवर तिघांनी केला अत्याचार; गुन्हा दाखल

यवतमाळ येथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नागपूरच्या मेडिकलमध्ये रेफर केले. आई-वडिलांजवळ पैसे नव्हते. मात्र, संतोषने मित्राला ५०० रुपये उसनवारीवर मागितले आणि बाळाला ११ सप्टेंबरला मेडिकलमध्ये हलविले.

मेडिकलमध्ये चिमुकलीवर उपचार सुरू झाले. मात्र, औषधांच्या चिठ्ठ्या हातात येत होत्या. पैसा नसल्याने औषधे कशी आणणार? हा प्रश्न त्यांना सतत सतावत होता. मनावर दगड ठेऊन त्यांनी बाळाला न घेता पळूव जाण्याचा निर्णय घेतला.

महत्त्वाची बातमी - अत्यंत दुर्दैवी! रिमझिम पावसात खेळण्याचा तिला आवरला नाही मोह आणि घडली हृदयद्रावक घटना

ओषण घेण्याच्या बहाण्याने दोघेही बाहेर पडले आणि पसार झाले. तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अजनी पोलिसांनी नियंत्रण कक्षाद्वारे यवतमाळ येथील पोलिसांना कळविले आहे. लवकरच नकोशी ठरलेल्या या चिमुकलीच्या आई-वडिलांना अटक होईल.

आई-वडिलांची उपासमार

मुलगी मेडिकलमधील खाटेवर उपचार घेत असताना आई-वडिलांची उपासमार होत होती. पूर्वी येथे अनेकांना मोफत जेवण मिळत असे; परंतु आता नातेवाइकांना जेवण मिळणे बंद झाले. दोन दिवसांपासून संतोष आणि मंदा दोघेही उपाशी होते. पोटातील भुकेमुळे या दोघांनीही चिमुकलाली मेडिकलमध्ये सोडून जाण्याचा निर्णय घेतला. लॉकडाउनमुळे सहा महिन्यांपासून हाताला काम नाही. त्यात जन्माला आलेल्या लेकीला गंभीर आजार. यामुळे डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले आणि अशातच या दाम्पत्याने मेडिकलमधून पळ काढला.

जाणून घ्या - प्रसूती शस्त्रक्रियेनंतरही मातेला होत होत्या असह्य वेदना; रुग्णालयात भरती करताच पोटात आढळले..

चिमुकली आई-वडिलांना ठरली नकोशी

बारा दिवसांच्या चिमुकलीला मेडिकलच्या खाटेवर सोडून आई-वडिलांनी पलायन केले. पोटातील भूक आणि उपचाराला पैसे नसल्याने ती चिमुकली आई-वडिलांना नकोशी ठरली. अजनी पोलिसांनी अपत्यास सोडून पळाल्याचा गुन्हा नोंदविला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leaving the baby, the parents fled