#Lockdown घरी बसून कंटाळले अन्‌ सुरू झाला हा ट्रेंड

भूषण काळे
Monday, 30 March 2020

भारतात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून 21 दिवसांचे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यामुळे कुणालाही घराबाहेर पडणे कठीण झाले आहेत. अत्यावश्‍यक असल्याच पोलिसांची पास घेणे बंधनकारक केले आहे. 

अमरावती : सध्या देशात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. चिनमधून आलेल्या व्हायरसने देशाला आपल्या कवेत घेतले आहे. कोरोना व्हायरसचे सर्वाधिक बळी इटलीत झाले आहेत. आतापर्यंत येथे 10,300 लोकांना जीव गमवावा लागल्याची माहिती आहे. भारतातही कोरोना आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचे लॉकडाऊन लागू केले आहे. यामुळे सर्वांना घरातच राहावे लागत आहे. अशात फावल्या वेळेत काय करावे असा यक्षप्रश्‍न नागरिकांना पडत आहे. मात्र, नेटिझन्सने रिकाम्या वेळेचा उपयुक्त वापर करीत जुन्या आठवणींना उजाळा देणे सुरू केले आहे. 

कोरोना व्हायरची भीती सर्वांना वाटत आहे. याची लागण आपल्याला होऊ नये म्हणून सर्वजण खबरदारीचे सर्व प्रयत्न करीत आहेत. यामुळे अनेकांनी घरीच राहणे सुरू केले आहे. भारतात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून 21 दिवसांचे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यामुळे कुणालाही घराबाहेर पडणे कठीण झाले आहेत. अत्यावश्‍यक असल्याच पोलिसांची पास घेणे बंधनकारक केले आहे.

अधिक वाचा - लॉकडाउनमुळे माहेरीच अडकली विवाहिता, प्रियकराने हितगुज साधण्याचा प्रयत्न केला अन्‌ कुटुंबीयांनी केले असे...

कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम किंवा ऑफिसच बंद ठेवल्याने अनेकांना फावला वेळ मिळाला आहे. यामुळे सोशल मीडियावर अनेकांचा वावर वाढला आहे. वेळ घालवण्यासाठी इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळेच अनेकजण एकमेकांच्या संपर्कात आले आहे. जुना आणि सध्याचा फोटोत झालेला बदल बघून युवक मंडळी आपला फावला वेळ मार्गी लावत आहे. केवळ युवकच नाही तर पन्नासी गाठलेले ज्येष्ठ नेटिझन्स देखील हा ट्रेंड पाळत असल्याचे सोशल मीडियावर बघायला मिळत आहे. 

चॅलेंज पूर्ण करून फोटो शेअर

फावल्या वेळेत सोशल मीडियावर जुने फोटो शेअर करून जुन्या आठवनींना उजाळा देण्याचा प्रयत्न नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहेत. सोशल मीडियावर साधारणतः पाच वर्षांपूर्वी काढलेले फोटो मित्रांना टॅग करण्यात येत आहे. या फोटोंवर मित्रांकडून कमेंट करून दाद दिली जात आहे. विशेष म्हणजे, यामध्ये चॅलेंजचा प्रकारही पाहायला मिळत आहे. दिलेले चॅलेंज पूर्ण करीत तो फोटोही सोशल मीडियावर शेअर केले जात असल्याचे प्रस्थ वाढले आहे.

जाणून घ्या - तू मला आवडली, माझ्याशी शारीरिक संबंध ठेव म्हणत करायचा हा प्रकार...

दिवस उजळताच नवनवीन शक्कल

नवीन दिवस उजाळल्यावर काय कराव, असा प्रश्‍न प्रत्येकाला पडत आहे. मात्र, युवक दररोज नवनवीन शक्कल लढवत आपला फावला वेळ उपयोगी आणत आहेत. लॉकडाऊनमुळे प्रत्येक जण सोशल मीडियावर ऍक्‍टिव्ह झाला आहे. काहींना तर दहा वर्षांपेक्षा अधिक दिवस झाले आहेत. याच सोशल मीडियावरील जुने फोटो सध्या उकरून काढण्याचा ट्रेंड बघायला मिळत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown has led to the sharing of old photos on social media