लाईव्ह न्यूज

Gadchiroli Crime : साडेपाच लाखांचा अवैध सुगंधित तंबाखू जप्त

Scented Tobacco Ban : गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी सुगंधित तंबाखूवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक कारवाई केली असून देसाईगंज तालुक्यात ५ लाख ४४ हजार ३०४ रुपयांचा अवैध तंबाखू जप्त केला आहे.
Gadchiroli Crime
Gadchiroli Crime Sakal
Updated on: 

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखू विक्री व वाहतुकीवर प्रतिबंध केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात देखील सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्यांवर अंकुश बसावा या उद्देशाने पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी गडचिरोली जिल्ह्यातील प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, अवैध दारू, जुगार व इतर अवैध व्यवसायांवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविली आहे.या पार्श्वभूमीवर पोलिसांनी देसाईगंज तालुक्यात तब्बल ५ लाख ४४ हजार ३०४ रुपयांचा अवैध सुगंधित तंबाखू जप्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com