esakal | नेहमीप्रमाणे पाणीपुरी विकून घरी आले अन् पहाटे दिसला लहान भावाचा मृतदेह; झाशीच्या युवकानं केली आत्महत्या 
sakal

बोलून बातमी शोधा

Man from UP ended his life in Aarni yavatmal

मृतकांचा मोठा भाऊ बिजलाल दयालसिंग बघेल आपली पत्नी मूलासह मृतक लहान भाऊ नरेश बघेल सोबत आर्णीतील शनिमंदीर परिसरात भाडयानी खोली करुन राहत होते आणी शहरात पाणीपूरीचा व्यवसाय करीत होते,

नेहमीप्रमाणे पाणीपुरी विकून घरी आले अन् पहाटे दिसला लहान भावाचा मृतदेह; झाशीच्या युवकानं केली आत्महत्या 

sakal_logo
By
बबलू जाधव

आर्णी (जि. यवतमाळ ) :  बूढेरधार जि, झाशी उत्तर प्रदेशातील युवकांनी आर्णीतील शनिमंदीर परीसरातील भाडयाच्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज ता,20 डिसेंबरला घडली असून मृतक यूवकांचे नाव नरेश दयालसिंग बघेल (वय19) रा,बूढेरधार जि,झाशी उत्तर प्रदेश ह,मू,शनिमंदीर परिसर आर्णी असे आहे.

मृतकांचा मोठा भाऊ बिजलाल दयालसिंग बघेल आपली पत्नी मूलासह मृतक लहान भाऊ नरेश बघेल सोबत आर्णीतील शनिमंदीर परिसरात भाडयानी खोली करुन राहत होते आणी शहरात पाणीपूरीचा व्यवसाय करीत होते, बिजलाल आणि त्यांचा लहान भाऊ नरेश दोघेभाऊ पाणीपुरीचा धंद्या करुन राञी नऊ वाजता दरम्यान घरी आले.

जाणून घ्या - २५ वर्षीय युवकाने उभारला देशातील पहिला ‘स्काय वॉक’; पंतप्रधान कार्यालयाने केले पंकजचे कौतुक 

घरी येवून जेवन वैगेरे झाले नंतर बिजलाल व त्याची पत्नी मूलासह एका खोलीत झोपले आणि लहान भाऊ नरेश बघेल हा दूसर्‍या खोली असलेल्या खोलीत झोपला आज ता, 20 डिसेंबरला सकाळी साडे पांच वाजता लहान भाऊ नरेशला ऊठवण्यात मोठा भाऊ बिजलाल गेले. लहान भाऊ नरेश बघेल यांनी नाँयलोन दोरीने गळफास घेवून मृत आवस्थेत आठळून आला,

मृतकांनी खोलीचे दार आतमधून लावून ठेवले होते अशी फीर्याद मृतकांचा मोठा भाऊ बिजलाल दयालसिंग बघेल (वय22)रा,बूढेरधार जि,झाशी उतर प्रदेश ह,मू,शनीमंदीर परिसर आर्णी यांनी आर्णी पोलीस स्टेशनला दिल्यावरुन मर्ग अंतर्गत गून्हा नोंद करून मृतक नरेश दयालल बघेल (वय 19) यांचे शविच्छेदन करुन मृत्यूदय नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आला.

अधिक वाचा - काम करताना लघुशंकेसाठी गेलेली महिला परतलीच नाही; आरडाओरड होताच बसला धक्का

सदर मृतकांचा पंचनामा जमादार बाबाराव पवार यांनी केलाअसून मृत्यूदय नातेवाईक आपल्या बूढेरधार जि,झाशी उतर प्रदेश ह्या आपल्यामूळ गावी घेवून गेले असून अतिमसंस्कार उत्तरप्रदेशात करणार आहे,वृत्तलिही पर्यत उत्तर प्रदेशातील युवक नरेश बघेल यांनी आत्महत्या कौणत्या कारणाने केली यांचे कारणमाञ कळू शकले नाही.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image