अनेक दारूमाफियांची आता चंद्रपूरवर नजर; ‘बार’साठी धडपड

अनेक दारूमाफियांची आता चंद्रपूरवर नजर; ‘बार’साठी धडपड

गडचिरोली : अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात असलेली दारूबंदी (Prohibition of alcohol in Gadchiroli district) उठली नसली, तरी नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी नुकतीच रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीचा फायदा उठवत मोठ्या प्रमाणात दारूतस्करी करणारे दारूमाफिया आता चंद्रपुरात (Liquor dealers targeted Chandrapur) सुरू झालेल्या दारू व्यवसायात उतरण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात वाइन बार उघडण्यासाठी अनेकांची धडपड (Struggling to open the bar) दिसून येत आहे. (Many-liquor-salear-are-now-looking-at-Chandrapur)

गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या दारूबंदीचा फायदा अनेक अवैध दारूविक्रेते व तस्कर कित्येक वर्षांपासून उचलत आहेत. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांसह तेलंगणा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश या राज्यांतूनही गडचिरोली जिल्ह्यात छुप्या मार्गाने दारू आणली जाते. पूर्वी दारूतस्करीचे प्रमाण अल्प होते. काही व्यक्ती नदी पार करून परजिल्ह्यात किंवा परराज्यात जाऊन दारू घेऊन यायचे. मग, सायकलने जाणे सुरू झाले. त्यानंतर मोटारसायकलींचा वापर सुरू झाला. पुढे चारचाकी आल्या. आतातर अशी परिस्थिती आहे की, दारूबंदी असतानाही गडचिरोली जिल्ह्यात ट्रक, कंटेनरसारख्या मोठ्या अवजड वाहनांतूनही दारू येते.

अनेक दारूमाफियांची आता चंद्रपूरवर नजर; ‘बार’साठी धडपड
काँग्रेसचे मजबुतीकरण की भाजप, राष्ट्रवादीला शह?

दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात इतर भागांतून दारू आणून अव्वाच्या सव्वा दराने विकणारे दारूविक्रेते हळूहळू गब्बर होत गेले. आपल्या व्यवसायात त्यांनी केवळ युवकच नव्हे, तर महिला व बालकांनाही सहभागी करून घेतले. तस्करीच्या पैशांतून गडगंज झालेल्या या दारूमाफियांना चंद्रपूरच्या दारूबंदीने फटका बसणार आहे. आता नजीकच्या चंद्रपूरातून सहज दारू उपलब्ध झाल्यास चोरीच्या मार्गाने इतर भागातून येणाऱ्या महाग दारूची मागणी कमी होईल.

त्यामुळे आपल्या अवैध व्यवसायावर विपरीत परिणाम होईल, हे या दारूमाफीयांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे येथे अवैध दारूतस्करी करण्यासोबतच आजपर्यंत कमविलेल्या संपत्तीचा थोडा भाग खर्च करून चंद्रपूर जिल्ह्यात वाइन बार सुरू करायचा आणि मद्यविक्रीचा परवाना मिळवून चंद्रपूर जिल्ह्यात वैध पद्धतीने हा व्यवसाय करायचा, असा अनेकांचा मनसूबा आहे. त्यासाठी सरकारी स्तरावर धावपळ करण्यासोबतच राजकीय व्यक्तींकडेही विनवणी सुरू झाली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील एका मोठ्या दारूमाफियाने एका मोठ्या नेत्याला मद्यविक्री परवाना व वाइन बारसाठी दहा लाख रुपये अग्रीम राशी दिल्याची माहिती गुप्त सूत्रांकडून मिळाली आहे. याशिवाय इतरही मोठे दारूमाफिया आता गडचिरोलीतील आपला मद्यविक्रीचा अवैध व्यवसाय चंद्रपुरात वैध पद्धतीने करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे चंद्रपुरातील वाइन बार सुरू होतील तेव्हा या मद्यशाळांची संख्या आपसूकच मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसणार आहे. त्यासाठीच अनेकजण सेटिंग करण्यात मग्न आहेत. छोट्या, मोठ्या नेत्यांची मनधरणी करून त्यांना पैशांचे आमिष देण्यासह शासकीय विभाग ते मंत्रालयापर्यंत येरझारा मारणे सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे.

अनेक दारूमाफियांची आता चंद्रपूरवर नजर; ‘बार’साठी धडपड
धोका वाढला! 'मेडिकल'च्या कोविड वॉर्डात दहा मुले भरती

दोन्ही हातात लाडू

गडचिरोली जिल्ह्यातील दारूमाफिया चंद्रपूर जिल्ह्यात मद्यविक्रीचा परवाना मिळवून वैध मद्यालये उघडण्याच्या प्रयत्नात असले, तरी सरकारी नियमांसह विक्री होणाऱ्या दारूपेक्षा दारूबंदी असलेल्या ठिकाणी अवैध पद्धतीने दारू विकल्यास अधिक नफा मिळतो हे त्यांना पक्के ठाऊक आहे. त्यामुळे चंद्रपुरात वैध मद्यविक्री करायची आणि दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही अवैध दारूविक्री करून आपले उखळ पांढरे करून घ्यायचे. म्हणून दोन्ही हातात लाडू ठेवण्याची तजवीज करण्याच्या प्रयत्नात हे दारूमाफिया आहेत.

(Many-liquor-salear-are-now-looking-at-Chandrapur)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com