अरे व्वा ! संविधानाला साक्षी माणून पार पाडला आदर्श विवाह

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

दोन महिन्यापूर्वी ठरला होता. यात विवाहासाठी पत्रिका, मंगलकार्यालय सर्व निश्चित झाले असताना गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउन सुरू असल्याने या दोन्ही कुटुंबात समन्वय होऊन लग्न सोहळा घरातील मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करण्याचे ठरविल्या गेले

अकोट (जि. अकोला) : लग्न म्हणचे मोठा डामाडोल वराती, पंगती, मंगल कार्यालय, डीजे, वाजंत्री असा अनेक हौस आणि खर्चाचा सोहळा असा काही महिण्यापर्यंत आपण पाहत होतो. परंतु, गेल्या दोन महिन्याहून अधिक काळ कोरोनाचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जगाच्या पाठीवर अनेक बदल झालेले दिसत असताना आता लग्न सोहळे अतिशय साध्या पध्दतीने होत आहेत. सुरक्षित अंतर आणि मोजक्याच घरच्या लोकांच्या उपस्थितीत आदर्श विवाह सोहळा संविधानाला साक्षी मानत साजरा करण्यात आला. असे लग्न करणारे कुटुंब हे साध्या पध्दतीने विवाह सोहळे साजरे करून समाजापुढे निश्चित एक आदर्श निर्माण करीत आहेत.

क्लिक करा- उष्माघाताचा राज्यातील पहिला बळी, या जिल्ह्याचा पारा 47 अंशाच्या पुढे

दोन महिन्याआधी ठरले होते लग्न
असाच एक लग्न सोहळा घनबहादुर परिवाराने वाढत्या कोरोना वायरसचे गांभीर्य लक्षात ठेवून सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करत भारतीय संविधानाला साक्षी मानून वर-वधू ने पार पाडला. संविधानाला साक्षी मानून पार पडलेला विवाह सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे. अकोट येथील रहिवासी सुरेश म.घनबहादूर यांचे चिरंजीव प्रवीण घनबहादुर व भोपापूर ता. अचलपूर येथील रहिवासी देविदास व. वानखडे यांच्यी कन्या कंचन वानखडे यांचा विवाह दोन महिन्यापूर्वी ठरला होता. यात विवाहासाठी पत्रिका, मंगलकार्यालय सर्व निश्चित झाले असताना गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउन सुरू असल्याने या दोन्ही कुटुंबात समन्वय होऊन लग्न सोहळा घरातील मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करण्याचे ठरविल्या गेले. या दोन्ही परिवाराने समाजाला एक वेगळा आदर्श देऊन संविधानाला साक्षी मानत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून लग्न विधी पार पाडला. हा विवाह कमी खर्चात आणि लॉकडाउनचे पालन करून अचलपूर तहसीलदारांच्या अनुमतीने फक्त 5 वऱ्हाडी सोबत नेत, मंगल सोहळा पार पाडला. या विवाहामुळे समाजात नवीन आदर्श निर्माण झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The marriage passed in a simple manner