esakal | मीनल कळसकर यांनी उमटविला महसुल विभागात ठसा
sakal

बोलून बातमी शोधा

Vidarbha

मीनल कळसकर यांनी उमटविला महसुल विभागात ठसा

sakal_logo
By
नीलेश डोये

नागपूर : शासकीय नोकरी (Gov Job) म्हणजे कायद्याच्या चौकटीत लोकांच्या हिताचे काम करण्याची मिळालेली संधी. लोकांच्या अडचणी दूर करताना सर्वच कामे नियमानुसार करता येत नाही. परंतु मुखात सरस्वती ठेवत नागरिकांचे समाधान करणे व प्रसंगी दुर्गा होत कठोर निर्णय घेणारी अधिकारी म्हणून मीनल कळसकर (Meenal Kalaskar) यांनी महसुल विभागात ठसा उमटविला आहे.

मीनल यांनी लहानपणीच सरकारी अधिकारी व्हायच ठरविलं होत. त्यामुळे त्या दृष्टीनेच वाटचाल केली. जिद्द आणि मेहनत घेतली. त्या म्हणाल्या की, आई, वडिलांकडून नेहमीच प्रेरणा मिळाली. बाबा तर परीक्षेच्या वेळी केंद्र आणि कक्ष शोधून देत होते. यथावकाश मी शासकीय नोकरीत प्रवेश केला. आई, वडिलांच्या प्रेरणेची जोड मिळाल्याने मला हे अवघड शिखर गाठता आले. अधिकारी म्हणून काम करताना अडचणी येतच असतात मात्र त्यातून मार्ग काढत समाजोपयोगी काम करण्यात आनंद असल्याचे त्यांचे मत आहे.

महिला आज कोणत्या क्षेत्रात पुरुषांच्या मागे नाहीत. किंबहुना त्या आघाडीवर आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा मानल्या जातो. या महसूल विभागात मोठ्या संख्येने महिला आहे. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाची धुराच महिलांच्या खांद्यावर आहे. जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी महिलाच अधिकारी आहेत. मीनल कळसकर या उपजिल्हाधिकारी असून निवडणूक विभागाच्या उपनिवडणूक अधिकारी आहे. पुणे शहरातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणही तेथूनच पूर्ण केले आणि वर्ष २००० मध्ये स्पर्धा परीक्षा पास करीत नायब तहसीलदार पदी २००१ मध्ये नियुक्ती मिळाली.

हेही वाचा: Pune: कोथरूड मध्ये विविध चौकात प्रेरणादायी शिल्प

पुणे जिल्ह्यात नायब तहसीलदार म्हणून विविध पदावर काम केले. त्यानंतर तहसीलदार पदी नियुक्ती मिळाली. आणि २०१९ मध्ये उपजिल्हाधिकारी पदी बढती मिळाली व नागपूरला रुजू झाल्या. लहानपणापासून त्यांनी शासकीय सेवेत जाण्याचा जंग बांधला होता. त्यांच्या मते ७-८ व्या वर्गात असतानाच त्यांनी ही निर्णय घेतला. कला शाखेत प्रवेश घेत स्पर्धा परीक्षेची तयारी केली. पालकांच्या प्रेरणेमुळेच यश मिळाल्याचे त्या नमूद करतात. विशेष म्हणजे महाबळेश्वरला पहिली महिला तहसीलदार होण्याचा मानही त्यांना मिळाल्याचे मीनल यांनी सांगितले.

हेही वाचा: पुणे : सोमेश्वरच्या निवडणुक प्रचाराच्या तोफा आज धडाडणार

गरीब, अडचणीतील गरजूंची काम केल्याचे समाधान आहे. काम झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान मिळते. माझ्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणेच इतरांचे काम करण्याचा प्रयत्न राहिला आहे. कामाचा ताण घरापर्यंत कधीच येऊ देत नाही. महिलांनी या क्षेत्रात पुढे आले पाहिजे.

-मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी

loading image
go to top