अभिजित समूहाचे मनोज जयस्वाल यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

बॅंकांचे 22 हजार कोटी थकविले

मुलालाही घेतले ताब्यात - ईडीची कारवाई 

नागपूर : अनेक बॅंकांचे कोट्यवधीचे कर्ज थकविणाऱ्या अभिजित समूहाचे अध्यक्ष मनोज जयस्वाल यांना मुलासह कोलकत्ता येथे सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. मनोज जयस्वालकडे 22 हजार कोटीपेक्षा अधिक विविध बॅंकांची थकबाकी असल्याची माहिती पुढे आली आहे. मनोज जयस्वाल याचा मुलगा अभिजित यालाहा अटक करण्यात आली आहे. 

कोळसा खाण वाटप घोटाळ्यातही मनोज जयस्वाल यांचे नाव होते. त्याचे सर्वच राजकीय पक्षातील बड्या नेत्यांशी संबंध आहेत. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जयस्वाल, कमलनाथ यांच्यासह भाजपाच्या मोठ्या नेत्यांशी त्यांची जवळिक आहे. उद्योगपती मनोज जयस्वाल हे नागपुरमधील बडे प्रस्थ आहेत. अभिजित समूह, जेएसएल इन्फ्रास्ट्रक्‍चर, एएमआर आयर्न ऍण्ड स्टील्स या कंपन्यांची रस्ते विकास, उर्जा, स्टील, लोखंड आणि खनिज उत्खनन क्षेत्रात मोठी गुंतवणूक आहे. नागपूरच्या मिहान प्रकल्पात त्यांचा कॅप्टिव्ह पॉवर प्लांट होता. तो आता बंद पडला आहे. 
कोळसा घोटाळ्यात मनोज जयस्वाल आरोपी आहेत. त्यांच्यासोबत माजी खासदार विजय दर्डा सहआरोपी आहेत. दर्डा यांच्या जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रा.लि. या कंपनीच्या नावावर छत्तीसगडमध्ये जयस्वालने कोल ब्लॉक घेतला होता. याची सध्या सीबीआयमार्फत चौकशी सुरू आहे. 

पाच वर्षापूर्वी नोव्हेबर महिन्यामध्ये सालबर्डी येथील लॉनवर मनोज जयस्वाल यांच्या मुलीच्या लग्नाचे जंगी रिसेप्शन झाले होते. यास अनेक पक्षांचे बडे नेते, बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. जयस्वाल यांच्या मालकीचे 2010 मध्ये निर्मित बॉम्बर्डिअर चॅलेंजर-605 
10 सिटर विमानसुद्धा होते. ते त्यांनी आयडीबीआय बॅंकेतून कर्ज घेऊन विकत घेतले होते. अनेक वर्षे नागपूर विमानतळावर पडून होते. त्याचे भाडे भरले नसल्याने महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण आणि आयडीबीआयने त्याचा लिलाव केला होता. स्वतःचे विमान वापरणारे मनोज जयस्वाल विदर्भातील पहिले उद्योगपती आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
'होय, मी फक्‍त शेतकरीच आहे'...!
#स्पर्धापरीक्षा - 'झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट' योजना​
धुळे: लोकसहभागातून घटबारी धरणाचे काम प्रगतीपथावर​
डोंगरावर फुलविले आमराईचे नंदनवन​
आई-वडिलांच्या प्रश्‍नाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या​
श्रीलंकेच्या चुकांमुळे पाक उपांत्य फेरीत​
गुजरातमध्ये स्मृती इराणींच्या दिशेने फेकल्या बांगड्या
जोगेश्वरीमध्ये शौचालयात आढळला पुरुषाचा मृतदेह

Web Title: nagpur news abhijit group manoj jaiswal arrested