सरावातून अनन्या झाली कोकिळ; खऱ्या कोकिळेशी रंगतेय जुगलबंदी

सरावातून अनन्या झाली कोकिळ; खऱ्या कोकिळेशी रंगतेय जुगलबंदी

नागपूर : कोरोना (coronavirus) आणि लॉकडाउनच्या काळात (lockdown) अनेकांचे जास्तीत जास्त दिवस घरीच राहण्यात गेले. काहीही काम नसल्याने टीव्ही, मोबाईलवरच वेळ गेला. अनेकांनी स्वयंपाक घरात वेळ घालवला. काहीतरी शिकायचे म्हणून नवीन नवीन खाद्य पदार्थ तयार करून बघितले. काहींनी आपला वेळ असाच वाया जाऊ दिला. मात्र, कोरोना काळात मिळालेल्‍या वेळेचा फायदा अनन्या रजत वरिष्ठ हिने चांगलाच घेतला. तिने चक्क कोकिळेचा हुबेहूब आवाज (cuckoo sound) काढून तिच्याशी मैत्रीच केली. आता अनन्या आणि कोकिळेची जुगलबंदी रंगते. (Ananya-started-making-cuckoo-sounds-out-of-practice)

अनन्या वरिष्ठ वाडी येथे राहते. ती दहा वर्षांची आहे. कोरोनाचा देशात शिरकाव झाल्यानंतर लॉकडाउन लावण्यात आले. यामुळे लहान मुलांचे घराबाहेर जाणे बंदच झाले. शाळा बंद, शिकवणी बंद, बाहेर खेळणे बंद, मित्रांच्या घरी जाणे बंदच झाले. यामुळे बच्चेकंपनी घरच्या घरी बंदिस्त झाली. कोरोनाच्या भीतीपोटी पालकांनी मुलांना घराबाहेर पडू दिले नाही. यामुळे ते चांगलेच कंटाळले होते.

सरावातून अनन्या झाली कोकिळ; खऱ्या कोकिळेशी रंगतेय जुगलबंदी
यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून दोन ठार; दुसऱ्या दिवशीही मुसळधार

काही बच्चेकंपनींनी आई-वडिलांशी वाद घालून बाहेर जाण्याची विनंती केली. काहींनी घरीच राहून टीव्ही आणि मोबाईलवर वेळ घालवला. मात्र, अनेकांनी लॉकडाउनच्या काळात मिळालेल्या संधीचे सोनं केलं. काहीतरी शिकण्याची जिद्द मनाशी बाळगून नानाविध गुण आत्मसात केले. लॉकडाउनच्या काळात मिळालेल्या संधीचे सोनं करणाऱ्या मुलींपैकी एक अनन्याही ठरली.

दहा वर्षीय अनन्याने सरावातून हुबेहूब कोकिळेचा आवाज काढण्याचे गुण आत्मसात केले. घरात राहून काय करायचे म्हणून ती कोकिळेचा आवाज काढू लागली. सतत सराव करीत राहिल्याने ती हळूहळू कोकीळ सारखाच आवाज काढू लागली. गॅलरीत बसून कोकिळेचा आवाज काढण्याचा सराव करीत असताना तिची कोकिळेशी मैत्री झाली. ही कोकीळ तिच्या आवाजाला प्रतिसाद देत असते. एकदा-दोनदा असेच घडले. आता तर कोकीळ दोन-तीन दिवसांतून एकदा अनन्याच्या घरा जवळ येते आणि त्यांच्यात जुगलबंदी सुरू होते.

तिचा तर्क ठरला खरा

सुरुवातीला अनन्या टाइमपास म्हणून कोकिळेचा आवाज काढत होती. ऑनलाइन कोडिंग क्लासमध्ये शिक्षिकेने सांगितल्यानंतर तिने प्रोजेक्ट तयार केला. त्या प्रोजेक्टमध्ये प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज चित्र व माहितीसह ऑडिओच्या स्वरूपात लावायचे होते. तिने प्राणी आणि पक्षांचे आवाज गुगलवरून डॉउनलोड केले. मात्र, कोकिळेचा आवाज तिने स्वतःचा लावला. अनेक दिवसांच्या मेहनतीतून ती कोकिळेचा आवाज काढायला शिकली होती. आवाज कोकिळेशी मिळत असल्याने तिने हा निर्णय घेतला.

सरावातून अनन्या झाली कोकिळ; खऱ्या कोकिळेशी रंगतेय जुगलबंदी
देवा... मी स्वप्नातही असा विचार केला नव्हता रेऽऽ

...अन् दोघींची रंगते जुगलबंदी

अनन्याला कोकिळेचा आवाज काढताना पाहून कुटुंबीयांनी सुरुवातीला विरोध केला. काय नेहमी ओरडत असते असं म्हणत रोष व्यक्त केला. मात्र, मुलगी ऐकत नसल्याचे पाहून बालहट्ट म्हणत तिच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, काही दिवसांतच अनन्या कोकिळेचा हुबेहूब आवाज काढू लागली. अनन्याची खऱ्या कोकिळेशी रंगणारी जुगलबंदी पाहून कुटुंबीयही आश्चर्यचकित झाले.

(Ananya-started-making-cuckoo-sounds-out-of-practice)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com