संघ मुख्यालयाच्या रेकी प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे

जैश-ए-मोहोम्मदच्या संशयित सदस्याला देखील एटीएसकडे सोपवण्यात येणार आहे.
RSS Headquarter
RSS Headquarter Google

काही महिन्‍यांपूर्वी जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या आतंकवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी नागपूर शहरात आरएसएसची (RSS) रेकी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यास अधिकृत दुजोरा दिला आहे. त्यानंतर आता महिनाभरानंतर या प्रकरणात सुरक्षा यंत्रणांनी महत्वाची पावलं उचलली आहेत. एटीएसच्या नागपूर युनिटकडे या प्रकरणाचा तपास सुपूर्द करण्यात आला असून, JEM या दहशतवादी संघटनेच्या दहशवाद्यांनी नागपुरातील RSS मुख्यालयाची रेकी करण्याच्या कथित प्रयत्नाचा तपास सुरू केला आहे.

RSS Headquarter
औरंगजेबाला आम्ही आदर्श मानतच नाही, जलील यांच राऊतांना उत्तर

हे प्रकरण आता एटीएसकडे सोपवण्यात आलं असल्याने, नागपूर गुन्हे शाखेने नोंदवलेले जबाब, सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित सर्व कागदपत्रं ATSकडे सोपवली आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासाला गती देण्यासाठी एटीएस लवकरच जम्मू-काश्मीरमधील संशयित जैश ए मोहोम्मदचा सदस्य रईस शेखला ताब्यात घेणार आहे. माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या निर्देशानंतर ATS ने या प्रकरणाचा ताबा घेतला.

RSS Headquarter
"तुम्ही आघाडीचा प्रस्ताव द्या, मी हिंदुत्वाच्या नावाने बोंब मारतो"

दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संघ मुख्यालय आणि स्मृती भवन परिसराची रेकी करणे ही गंभीर बाब आहे. याला अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com