फलक शिवभोजनाचा; विक्री मात्र चिकन, मटणाची

shivbhojan thali
shivbhojan thalie sakal

नागपूर : राज्य सरकारने गरजूंसाठी शिवभोजन थाळी सुरू केली आहे. मात्र, याचा गैरफायदा घेणारेच अधिक आहे. शिवभोजन थाळीचा फलक लाऊन मागच्या दाराने चिकन, मटणाची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार कळमनामध्ये उघडकीस आला आहे.

shivbhojan thali
आशिया खंडातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयाचं शवागार हाऊसफुल्ल

राज्य सरकारने लॉकडाउन जाहीर करताना गोरगरिबांचे हाल होऊ नये याकरिता शिवभोजन थाळीला बंद मधून सूट दिली आहे. याचा फायदा घेऊन पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी एका भोजनालयाने आपल्या दुकानासमोर शिवभोजन थाळीचा फलक लावला. मात्र, प्रत्यक्षात तो मटण, चिकनची विक्री करीत होता. याविरोधात स्थानिक कामगारांनी भारतीय जनता युवा मोर्चाकडे याची तक्रार केली. नगरसेवक प्रदीप पोहाने यांची याची खातरजमा करण्यासाठी आपली चमू पाठवली. पूर्व नागपूरचे अध्यक्ष सनी राऊत, माजी अध्यक्ष सचिन करारे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असताना मटण, चिकनची विक्री होत असल्याचे आढळून आले. अनेक शिवभोजन केंद्राची तपासणी केली असता गोरगरिबांना अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे

shivbhojan thali
१५ दिवसांत तब्बल ३४ मृत्यू! गावात स्मशान शांतता

ग्रामीणमध्ये शिवभोजन, थाळी होणार निशुल्क

एक महिन्याच्या कालावधीसाठी शिवभोजन थाळी लाभार्थ्याना निशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दर दिवशी २ लाख शिवभोजन थाळीचे वितरण होणार आहे. सध्या नागपूर ग्रामीण भागात एकूण २४ शिवभोजन केंद्र असून दररोज एकूण २२७५ लाभार्थी लाभ घेत आहेत. शिवभोजन केंद्रातून दुपारी ११ ते ४ या कालावधीत पार्सल सुविधेव्दारे ग्राहकांना भोजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासन निर्देशानुसार शिवभोजन केंद्राच्या प्रतिदिन इष्टांकामध्ये दीड पट वाढ केली आहे. या वेळेत कोणीही शिवभोजनाविना परत जाणार नाही तसेच कोणत्याही सबळ कारणांशिवाय शिवभोजन केंद्र बंद ठेवता येणार नाही,असे जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com