esakal | Big Breaking : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विमानतळावर जंगी स्वागत; गोरेवाडा प्राणी संग्रहालयाकडे प्रयाण
sakal

बोलून बातमी शोधा

Chief Minister Udhav Thakare arrives in Nagpur

वन्यप्राणी या उद्यानात स्थलांतरित करण्यात आले आहेत. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होणार आहेत. वन्यजीव संवर्धन, पुनर्वसनासह संशोधन व शिक्षण याबाबतही येथे लवकरच सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.

Big Breaking : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विमानतळावर जंगी स्वागत; गोरेवाडा प्राणी संग्रहालयाकडे प्रयाण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : नागपूर शहरालगतच ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान’ पर्यटकांसाठी नवे आकर्षण ठरणार आहे. या प्राणी उद्यानाचे उद्‍घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी, २६ जानेवारीला होणार असल्याने ते नागपुरात दाखल झाले. विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास आगमन झाले. यावेळी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

महापौर दयाशंकर तिवारी, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशीष जैस्वाल, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) राकेश ओला, डॉ. बसवराज तेली, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले.

स्वागत स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे गोरेवाडा येथील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाकडे प्रयाण केले. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे नागपूर येथील महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या अखत्यारित आहे. उद्घाटनानंतर लगेच भारतीय सफारी नागरिकांसाठी खुली होणार आहे. ४० आसन क्षमतेची तीन विशेष वाहने व ऑनलाइन तिकीट बुकिंग सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

अधिक वाचा - माणुसकीला कळीमा! बाळाचा जन्म अन् पतीचा मृत्यू; बाळ अपशकुनी असल्याचे समजून केले भयानक कृत्य

१९१४ हेक्टर वनक्षेत्रावर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी उद्यान साकारले आहे. देशातील अशाप्रकारचे हे सर्वात मोठे प्राणी उद्यान असून, विदर्भातील पर्यटकांसाठी हे नवे पर्यटनस्थळ ठरणार आहे. प्राणी उद्यानात वाघ, अस्वल, बिबट आणि तृणभक्षी प्राणी सफारीचे काम पूर्ण झाले आहे. वन्यप्राणी या उद्यानात स्थलांतरित करण्यात आले आहेत. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होणार आहेत. वन्यजीव संवर्धन, पुनर्वसनासह संशोधन व शिक्षण याबाबतही येथे लवकरच सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.

इंडियन सफारीतील प्राणी 
प्राणी - संख्या 
वाघ - २ (राजकुमार आणि वाघीण ली) 
बिबट - ७ 
अस्वल ः ६ 
निलगाय - १४ 
चितळ - ४ 

प्रवेश शुल्क - वातानकूलित बेंझ बस - आयशर वातानुकूलित बस - साधी बस तृणभक्षक प्राणी (स्वागत दर म्हणून सध्या २० टक्के सूट) 
दर - प्रत्यक्ष - सूट - प्रत्यक्ष - सूट - प्रत्यक्ष- सूट 
आठवड्यातील पाच दिवस ः ३०० - २४० - २००- १६० - १०० - १०० 
शनिवार आणि रविवार - ४००- ३२० - ३०० - २४० - १०० - १०० 

सफारीच्या वेळा 
उन्हाळा - १५ मार्च ते १५ जून - ७.३० ते ११.३० वाजता 
दुपारी ३.३० ते ६.३० वाजता 
हिवाळा - १६ जून ते १४ मार्च ८.३०ते ५.३० वाजेपर्यंत

loading image