esakal | कोरोनाने केला घात; तब्बल इतके मुलं झाली अनाथ
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कोरोनाने केला घात; नागपूर जिल्ह्यात तब्बल इतके मुलं झाली अनाथ

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : दीड ते पावणे दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाने चांगलेच थैमान घातले. या संकटात अनेक मुलांनी आई-वडिलांना गमावल्याने अनाथ झाली आहेत. कोरोनाच्या या महामारीत एकट्या नागपूर जिल्ह्यात २०३१ पाल्यांनी आई-वडिलांना गमावले तर ६९ पाल्यांना आई किंवा वडिलांच्या प्रेमापासून पोरके व्हावे लागले आहे, अशी माहिती राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून प्राप्त झाली आहे. मात्र, यातील मुली आणि मुले किती हे स्पष्टपणे सांगता येणार नाही. ही सर्व बालक १८ वर्षांखालील आहेत.

मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभाव मिटवण्यासाठी, त्यांना सर्व क्षेत्रात समान संधी, शिक्षणाचा हक्क मिळावा, त्यांची जनजागृती व्हावी या उद्देशाने जागतिक मुलगी दिन साजरा केला जातो. समाजात पूर्वापार मुलींचे मुलांच्या बरोबरीचे स्थान असून, आतापर्यंत तिचे अस्तित्व नाकारण्याचाच प्रयत्न होत राहिला. मात्र, आता त्यांचे महत्त्व आणि अस्तित्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. याच सामूहिक प्रयत्नातून देशाच्या जडणघडणीत स्त्रियांचा वाटा वाढला आहे. असे असले तरी कोरोनाने अनेक मुला-मुलींना आई-वडिलांपासून दूर केले आहे. तर कित्येक मुलांनी एका पालकाला गमावले आहे. यामुळे लहान वयातच मोठे संकट कोसळले आहे.

हेही वाचा: पाचही मुलीच झाल्याने तलाक, तलाक, तलाक

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर अनेकांना प्राण गमवावे लागले. येणारी वेळ कशी राहील हे कुणीच सांगू शकत नाही, हे यावरून सिद्ध झाले. कोरोनामुळे कोणी मुलगा, आई-वडील, पतीला गमावले तर कोणी पत्नीला... कोरोनाच्या या भीषण काळात कोणीच कोणाच्या मदतीला धावून आले नाही. कारण, वेळच तशी वाईट होती. एकट्या नागपूर जिल्ह्यात २,१०० पाल्यांवर आई-वडील तसेच आई किंवा वडिलांना गमवण्याची वेळ आली. त्यामुळे त्यांच्या पालन-पोषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

९३० महिला झाल्या विधवा

कोरोनाच्या या भीषण काळात अनेकांच्या घरातील कर्ता पुरुष मरण पावला. घरचा आधारस्तंभच कोसळल्याने तब्बल ९३० महिला विधवा झाल्या. यामुळे या महिलांवर मोठे संकट कोसळले आहे. हा आकडा महिला व बालविकास विभागाकडे झालेल्या नोंदीचा आहे. तर कित्येक जणांची अद्याप नोंद झालेली नाही. यामुळे हा आकडा निश्चितच जास्त होईल.

हेही वाचा: निर्जनस्‍थळी पोत्‍यामध्ये आढळला मृतदेह; अनैतिक संबंधातून खून

बालगृहात सहा मुली

आई-वडील असे दोन्ही पालक गमावणाऱ्या सहा मुलींना सध्या बालगृहात ठेवण्यात आले आहे. ज्यांच्या घरची परिस्थिती चांगली नाही किंवा जे मुलांचे पालनपोषण करण्यास सक्षम नाहीत. अशा मुलांच्या नातेवाइकांची परवानगी घेऊन त्यांना बालगृहात ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत सहा मुली बालगृहात दाखल झालेल्या आहेत.

नागपूर विभाग

जिल्हा अनाथ झालेले बालक

  • भंडारा ५२९

  • गोंदिया २६२

  • चंद्रपूर ५७४

  • गडचिरोली १५२

  • वर्धा ४५७

मार्च २०२० ते आतापर्यंत ज्यांनी पालकांना गमावले असेल त्यांनी जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत क्रमांक दोन, सहावा माळा, सिव्हिल लाइन नागपूर, येथे संपर्क साधावा. जेणे करून त्यांना योजनेचा लाभ देता येईल.
- मुश्ताक पठाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, नागपूर

हेही वाचा: शारीरिक संबंधास नकार; पतीने कुऱ्हाडीने केला पत्नीचा खून

नागपूर जिल्ह्यातील एकूण २,१०० पेक्षा जास्त बालकांनी आई किंवा वडिलांना गमावले आहे तर ६९ बालकांनी दोघांनाही गमावले. तर एकूण ९३० महिला विधवा झाल्या आहेत. विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
- अपर्णा कोल्हे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नागपूर
loading image
go to top