संजय गायकवाड यांची रात्रीची उतरली नसावी, सेना आमदाराला फडणवीसांचे प्रत्युत्तर

devendra fadnavis
devendra fadnavise sakal

नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलेय. कोरोनाचा धोका सामान्य माणसांपेक्षा तळीरामांनाच अधिक असतो. गायकवाड यांची रात्रीची उतरली नसेल. त्यामुळे असे वक्तव्य करत असल्याचा टोला फडणवीसांनी लगावला.

devendra fadnavis
उद्योजकांनो! आता अधिकच्या वीजबिलातून होणार सुटका, तरुणांनी शोधलीय भन्नाट आयडिया

'मला त्यांना एकच विनंती करायची आहे की त्यांनी अशाप्रकारे कोरोनाचे विषाणू माझ्या घशात घालण्याआधी हँड ग्लोव्हज घालावेत आणि नीट मास्क लावावं. कारण मला तर जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे मला कोरोनाच्या विषाणूने फार काही होईल असं मला वाटत नाही. पण असं म्हणतात की सामान्य माणसांपेक्षा जे तळीराम असतात त्यांना कोरोना लवकर होतो. त्यामुळे त्यांना जर असं करायची इच्छ असेल तर त्यांनी हँड ग्लोव्हज आणि मास्क वापरावा.' असेही फडणवीस म्हणाले.

devendra fadnavis
आता चक्क कार्यालयासमोरच होणार कोरोना चाचणी, पॉझिटिव्ह आढळल्यास गुन्हा दाखल

काय म्हणाले होते संजय गायकवाड?

मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलं होतं. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल देखील झाला होता. त्यानंतर भाजप कार्यकर्ते या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी भाजप अन् सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com