esakal | कुख्यात गुंड अज्जू तलवार घेऊन कुणाचा तरी करणार होता गेम; पोलिसांमुळे घडला पुढील घटनाक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

Don arrested before murder in Nagpur Crime marathi news

युनिट चारचे अधिकारी टोळीयुद्ध होऊ नये म्हणून आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान अजय हा तलवार घेऊन हल्ला करण्यासाठी जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने लगेच इमामवाडा झोपडपट्टीत सापळा रचून अजयला अटक केली.

कुख्यात गुंड अज्जू तलवार घेऊन कुणाचा तरी करणार होता गेम; पोलिसांमुळे घडला पुढील घटनाक्रम

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : अज्जू हा नंगी तलवार घेऊन कुणाचा तरी गेम करण्याचा तयारीत असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली. इमामवाडा पोलिसांनी त्वरेने कारवाई करीत वेळीच अज्जूला बेड्या ठोकल्याने कुणाचा तरी जीव वाटला. त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्जू उर्फ अजय प्रभाकर पाहुणे (४६, रा. इमामवाडा झोपडपट्टी) हा गुन्हेगारी जगतातील मोठा गुंड आहे. २००७ पासून  गुन्हेगारी जगात सक्रिय आहे. त्याच्यावर आतापर्यंत २० गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न, दरोडा टाकण्याचा प्रयत्न, जुगार खेळणे, अवैध दारू विक्री करणे, सामाजिक शांतता भंग करून दहशत निर्माण करणे आदी खटले त्याच्यावर सुरू आहेत.

अधिक वाचा - एकाचवेळी दहा गावांमध्ये दुःखाचा महापूर, बाळाला दूध पाजून येताच क्षणार्धातच कळली मृत्यूची बातमी

युनिट चारचे अधिकारी टोळीयुद्ध होऊ नये म्हणून आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान अजय हा तलवार घेऊन हल्ला करण्यासाठी जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने लगेच इमामवाडा झोपडपट्टीत सापळा रचून अजयला अटक केली. त्याच्या ताब्यातून धारदार तलवार जप्त केली. तो कुणाचा तरी गेम करण्याच्या तयारीत होता. मात्र, त्यापूर्वीच अज्जूला अटक केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

ही कारवाई गुन्हे शाखेचे डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम, सहायक पोलिस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के, विजय कसोधन, रमेश उमाठे, राजकुमार शर्मा, दिपक बोले, सचिन तुमसरे, सतीश ठाकरे, नरेंद्र बांते आणि अविनाश ठाकूर यांनी केली.

जाणून घ्या - (Video) Bhandara Hospital fire news : दोनदा पडलो पण पत्नी आणि मुलाला सुखरूप बाहेर काढले

गोलूला तलवारीसह अटक

कुख्यात गुंड गोलू उर्फ अरमान विजय मोगरे (२३, रा. कुंजीलालपेठ) हा बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास परदेशी मोहल्ल्यात तलवारीसह धामधूम करीत होता. माहिती मिळताच त्याला युनिट चारच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली असून, अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image