नागपूर, अमरावती व अकोला : प्रभाग रचना जाहीर; आता आरक्षणाकडे लक्ष

Nagpur Muncipal Corporation
Nagpur Muncipal CorporationNagpur Municipal Corporation

नागपूर : सुमारे दोन महिन्यांपासून प्रभाग रचनेची प्रतीक्षा करीत असलेल्या इच्छुक उमेदवारांची उत्सुकता मंगळवारी (ता. १) संपली. महापालिकेने ५२ प्रभागांची रचना जाहीर (Draft plan of Nagpur ward announced) केल्याने सर्वांचे लक्ष आरक्षणाकडे लागले आहे. प्रभाग रचनेसोबत जातीनिहाय लोकसंख्याही सोबत सादर केल्याने आरक्षित होणाऱ्या प्रभागांचा अंदाज आला आहे. एकूणच नव्या प्रभाग रचनेवरून सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसलाही विजयाची समान संधी उपलब्ध राहणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

महापालिकेची (Municipal Election) मागील निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्यात आली होती. महाविकास आघाडीने यात बदल केला आहे. आता तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्यात येणार आहे. एका प्रभागात जास्तीत जास्त ५१ हजार तर कमीत कमी ४२ हजार लोकसंख्या राहणार आहे. शहरात एकूण ५२ प्रभाग असून, नगरसेवकांची संख्या १५६ इतकी राहणार आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा सात नगरसेवकांची भर पडणार (Draft plan of Nagpur ward announced) आहे.

Nagpur Muncipal Corporation
मध्यरात्री गेला प्रेयसीला भेटायला; दाट धुक्यामुळे विहिरीत पडला अन्...

भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने प्रभाग रचनेत मोठे फेरबदल होतील अशी शंका वर्तविली जात होती. मात्र, जुन्या प्रभागांची फारशी तोडफोड झाल्याचे दिसून येत नाही. याउलट अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्यांक समाजाच्या वस्त्यांना एकत्र करण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे अल्पसंख्यांक नगरसेवकांची (Corporator) संख्या यंदाच्या निवडणुकीत वाढणार असल्याचे दिसून येते.

Nagpur Muncipal Corporation
चंद्रशेखर बावनकुळेंकडे कोट्यवधींचा काळा पैसा; नातेवाइकाचा आरोप

महापौर सर्वाधिक सुरक्षित

विद्यमान महापौर दयाशंकर तिवारी यांचा प्रभाग भाजपसाठी एकदम सुरक्षित झाला आहे. त्यांच्या प्रभागाच्या सभोवताल असलेल्या मुस्लिम वस्त्या त्यांच्या जुन्या प्रभागातून वगळण्यात आल्या आहेत. नव्या रचनेत मुस्लिम वस्त्या वेगळ्या प्रभागात जवळपास एकत्रित केल्या आहेत. त्यामुळे येथील भाजपचे टेंशन जवळपास संपले आहे.

आभा पांडे यांना टेंशन

चारच्या प्रभागात शहरातून एकमेव निवडून आलेल्या ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांच्या प्रभागाचे जवळपास दोन तुकडे झाले आहे आहेत. त्यामुळे त्यांचे टेंशन वाढले आहे. अलीकडेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्या प्रदेश सरचिटणीस आहेत. राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदीसुद्धा त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीत असल्याने यावेळी त्यांना निवडणूक लढताना दोन उमेदवारांची सोबत राहणार हा त्यांच्यासाठी दिलासा ठरू शकतो.

Nagpur Muncipal Corporation
मुलाला दिले इलेक्ट्रिक शॉक; मिराम तेरनच्या वडिलांचा आरोप

सर्वांत मोठा प्रभाग २५

शहरातील सर्वांत मोठा प्रभाग २५ क्रमांकाचा राहणार आहे. येथील एकूण लोकसंख्या ५१ हजार ३३६ इतकी आहे. यात ५ हजार ८१७, अनुसूचित जमातीचे ११ हजार ८२८ मते यात आहेत. या प्रभागात इतवारी, कुंभारपुरा, जुनी मंगळवारी, आयचित मंदिर, भुतेश्वर नगर, गंगाबाई घाट या वस्त्यांचा समावेश आहे.

सर्वांत लहान प्रभाग ४७

सर्वांत लहान प्रभाग ४७ क्रमांकाचा आहे. येथील लोकसंख्या ४२ हजार ८३३ लोकसंख्या, असुसूचित जाती ३ हजार ४१० व अनुसूचित जमातीची एक हजार ९१७ इतकी लोकसंख्या आहे. या प्रभागात जंबुदीपनगर, महालक्ष्मीनगर, अयोध्यानगर, बीडीठेप, न्यू सुभेदारनगर या प्रमुख वस्त्यांचा समावेश आहे.

अमरावती महानगरपालिका प्रभाग रचना विशेष

  • अमरावती महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे प्रारूप मंगळवारी (ता.१) जाहीर करण्यात आले. २०११ च्या जनगणनेनुसार हे प्रारूप तयार करण्यात आले.

  • सदस्यसंख्या : ८७ वरून ९८ वर पोहोचली.

  • प्रभागांची संख्या : २३ वरून ३३ वर.

  • बडनेरा उपनगरातील आठवडी बाजार हा सर्वांत कमी लोकसंख्येचा प्रभाग.

  • ३२ प्रभाग तीन सदस्यांसाठी तर एक प्रभाग दोन सदस्यांसाठी राहणार आहे.

  • १७ जागा अनुसूचित जातीसाठी, २ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव.

  • आरक्षित जागा : महिलांसाठी ४९

  • एकूण लोकसंख्या : ६, ४७, ०५७

  • अनुसूचित जाती : १, ११, ४३५

  • अनुसूचित जमाती : १५, ९५५

अकोला महानगरपालिका प्रभाग रचना

अकोला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे प्रारूप मंगळवारी (ता.१) जाहीर करण्यात आले. २०११ च्या जनगणनेनुसार हे प्रारूप तयार करण्यात आले.

  • सदस्यसंख्या : ८० वरून ९१ वर पोहोचली.

  • प्रभागांची संख्या : २० वरून ३० वर.

  • अकोट फैल परिसरातील प्रभाग क्रमांत तीन हा सर्वांत कमी लोकसंख्येचा प्रभाग.

  • २९ प्रभाग तीन सदस्यांसाठी तर एक प्रभाग चार सदस्यांसाठी राहणार आहे.

  • १५ जागा अनुसूचित जातीसाठी, २ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव.

  • आरक्षित जागा : महिलांसाठी ४६

  • एकूण लोकसंख्या : ५, ३६, ५४०

  • अनुसूचित जाती : ९०, ९४२

  • अनुसूचित जमाती : ११, ५७४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com