Expulsion of flood victims from school as school starts
Expulsion of flood victims from school as school starts

ते ढसा ढसा रडत म्हणाले, ‘सोड्याच्या चुंगड्या बांधून कसेतरी रायतो जी’ आता शाळेतूनही हकालपट्टी झाली

कोदामेंढी (जि. नागपूर) : कन्हान नदीच्या पुराने पानमारा आणि नांदगाव गावातील घरे आणि शेतीची पूर्ण पडझड झाली. गावकऱ्यांनी नाईलाजाने गावातील शाळेत आसरा घेतला. मात्र, आता शाळा सुरू होणार आसल्याचे सांगत त्यांची या तात्पुरत्या निवाऱ्यातूनही हकालपट्टी झाली आहे.

पानमारा आणि नांदगाव या गावांपासून अगदी हाकेच्या अंतरावरून कन्हान नदी वाहते. कमी लोकवस्तीची गावे. शेती आणि शेतमजुरी हाच येथील लोकांचा व्यवसाय. पुराने गावाला वेढले होते. सगळीकडे पाणीच पाणी होते. पुरात शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरांची पडझड झाली.

बत्तीस वर्षांपासून गावात राहणारे घनश्याम चतुर्वेदी लकव्याने ग्रस्त आहेत. ‘पुरा डूब गया था, अभी भी गिला है, स्कुल मे रह रहे थे, अभी निकाल दिये’ पुराचे पाणी घरात शिरल्याने प्रशासनाने त्यांची राहण्याची सोय गावातील शाळेत केली. मुलीच्या मोलमजुरीवर चतुर्वेदी कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. कुडाच्या भिंती असलेल्या झोपडीत ते राहतात. पुरामुळे त्यांच्या झोपडीचा ओलावा आजची कायम आहे. पुरामुळे अन्नधान्य वाहून गेले. मात्र, शाळा सुरू होणार म्हणून शाळेच्या मॅडम आणि काही लोकांनी शाळेतून काढले असल्याचे घनश्याम सांगतात.

शाळेत पंधरा दिवस राहिलो. शाळा सुरू होईल म्हणून आम्ही शाळेतून निघालो. पुरात घर पडल्याने सोड्याच्या चुंगड्या बांधून कसेतरी रायतो. साप विंचूचा भेव आहे जी. त्याच दिवशी मोठा साप घरात निघला. करतो बापा कसेही चटणी आंबील. रोजी रोटी नाही. कसेतरी गुजारा करतो. अशी विदारकता नांदगाव येथील पुरपीडित कुसुम मेश्राम महिलेने मांडली.

घरात चिखलाचा फसन होता. इकडून तिकडून उसनवारी घेऊन कसेतरी परिस्थिती सांभाळल्याचे सेवक मेश्राम सांगतात. दोन महिन्यांआधी घर बांधले. पूर आला, घरात माणूसभर पाणी होता. तांदूळ गहू भिजले. थांबता पाणी होता. दोन दिवस गावात पाणी होता. सध्या शाळेत राहतो. धान्य मिळाले पण पुराचा घाव बसण्यासारखा नसल्याचे पानमारा येथील ललिता चाफले सांगतात.

पूर डगर झाला. १९४२ च्या पुरापेक्षा अधिक झाला. नुकसान झाली. वालवेल गेला. सावरसवर करून शेळ्या, गायढोरे वाचली. आता इथेच बांधतो. ८५ वर्षीय म्हातारा आपली झोपडी सावरत सांगत होता. पुरामुळे धान, सोयाबीन, कापूस आदी पीक वाहून गेले.

पीक कुरपून गेले असून शेतजमिनीला भेगा पडल्या. नवीन पीक उगवायचे म्हटल्यास बियाणे घेण्यासाठी पैसा अदला नाही. त्यामुळे शेतावर स्मशान शांतता. मजुरी नसल्याने कसेतरी चटणी भाकर खाऊन दिवस काढताहेत. शासनाची पुढील मदत मिळाल्यास काही तरी करता येईल या आशेवर येथील पुरपीडित आहेत.

शासनाचा सर्वेक्षणानुसार

  • गाव : पानमारा
  • एकूण घरांची पडझड : ५ घरे
  • शेतपिकांचे नुकसान : ३४.१० हेक्टर आर क्षेत्रफळ
  • गाव : नांदगाव
  • एकूण घरांची पडझड : २० घरे
  • शेतपिकांचे नुकसान : ६९.८६ हेक्टर आर क्षेत्रफळ

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com