अर्थसंकल्पावर सत्ताधारी खुश, पण उत्पन्नाबाबत वित्त सभापतीच अनभिज्ञ

finance chairman of nagpur zp do not know about zp revenue
finance chairman of nagpur zp do not know about zp revenue
Updated on

नागपूर : जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पावर सत्ताधारी खूश असून विरोधकांनी टीका केली. तर, अर्थसंकल्प सादर करणाऱ्या वित्त सभापती भारती पाटील यांनाच उत्पन्नाची माहिती नाही. करातील उत्पन्न, शासनाच्या अनुदानाच्या रकमेबाबत ते अनभिज्ञ आहेत. 

यंदाच्या वर्ष २०२१-२२ साठी भारती पाटील यांनी ३३ कोटी ६७ लाखांचा अर्थसंकल्प दिला. तर, वर्ष २०२०-२१ चा सुधारित अर्थसंकल्प १९ कोटी ८२ लाखांचा सादर केला. तत्कालीन सीईओ संजय यादव यांनी ३३ कोटी ७५ लाखांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामुळे जवळपास १४ कोटींनी वर्ष २०२०-२१चा अर्थसंकल्प कमी आहे. याबाबत पाटील यांना विचारणा केली असता उत्पन्नाबाबतची माहिती त्यांच्याकडे नसल्याचे समोर आले. आर्थिक वर्षात एकही रुपया शासनाकडून आला नसून संपूर्ण १९ कोटी रुपये मागील आर्थिक वर्षातील अखर्चित निधी असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. त्याच रकमेतून संपूर्ण खर्च भागविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, मालमत्ता कर आणि बाजार आणि इतर स्रोतांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला उत्पन्न मिळते. त्यामुळे हे उत्पन्‍न गेले कुठे, असा सवाल उपस्थित होतो. मिळालेले उत्पन्न अर्थसंकल्पात अंतर्भूत असतात. त्यांना त्याची माहितीच नसेल, असे जाणकार म्हणतात. उत्पन्नाबाबतची संपूर्ण माहिती नसल्याने तो तयार कुणी केला, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

२०२०-२१ या आर्थिक वर्षात सरकारकडून एकही रुपया मिळाला नाही. त्यामुळे खर्चावर मर्यादा आल्या असून योजना राबविता आल्या नाहीत. वर्ष २०१९-२० या काळात १९ कोटींचा निधी शिल्लक होता. त्याच निधीतून या आर्थिक वर्षाचा अर्थव्यवहार चालला. सरकारकडून सर्व जुनी देणी यंदा मिळण्याची अपेक्षा आहे. 
-भारती पाटील, वित्त सभापती 

सर्वसमावेशक अर्थसंकल्प 
प्रत्येक विभाग व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून झाला. आमचा ग्रामीण भागाशी संपर्क असल्याने कृषीसाठी भरीव तरतूद केली. शेतकऱ्याला याचा फायदा होईल. सर्वसमावेश अर्थसंकल्प आहे. 
-रश्मी बर्वे, अध्यक्ष 

निरर्थक अर्थसंकल्प - 
शेतकऱ्यांसाठी अधिकचा निधी दिल्याचे सांगितले जात असले तरीसुद्धा तो अधिकचा निधी हा पशुसंवर्धनला गृहित धरून दिलेला आहे. लघुसिंचन, आरोग्यला कमी निधी दिला. ही वेळ नसतानाही बांधकाम विभागाला अधिकचा निधी दिला. हा निरर्थक अर्थसंकल्प आहे. 
-व्यंकट कारेमोरे, उपनेते, भाजप 

आरोग्यावर भर द्यावा -
कृषी विभागासाठी अधिकची तरतूद करण्यात आली आहे. ही बाब अभिनंदनीय आहे. मात्र, अद्याप कोरोनाचे संकट टळलेले नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आरोग्याला के‌वळ चार लाख अधिक देण्यात आले आहेत. त्यामुळे आरोग्यावर अधिकचा निधी गरजेचे आहे. 
-सलिल देशमुख, राष्ट्रवादी सदस्य 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com