esakal | फुलांचा बाजार फुलला! मंदिरे बंद असल्यामुळे मागणी निम्‍म्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

फुलांचा बाजार फुलला! मंदिरे बंद असल्यामुळे मागणी निम्‍म्यावर

फुलांची आवक मागणीच्या तुलनेत कमी असल्याने भाव स्थिरावलेले आहेत.

फुलांचा बाजार फुलला! मंदिरे बंद असल्यामुळे मागणी निम्‍म्यावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर: लग्नसमारंभासह इतर कार्यक्रमाला सुरवात झाल्याने गेल्या चार महिन्यापासून कोमेजलेल्या फुलांचा बाजार (Flower market) थोड्या फार प्रमाणात फुलला आहे. मंदिरे बंद असल्याने मागणी कमी (Decreased demand) आहे. फुलांची आवक मागणीच्या तुलनेत कमी असल्याने भाव स्थिरावलेले आहेत.

हेही वाचा: बळजबरी धर्मांतर प्रकरणाचे नागपूर कनेक्शन, UP ATS कडून तिघांना अटक

फूल मार्केटमध्ये सध्या झेंडू, जरबेरा, डच गुलाब, शिर्डी गुलाब, लिली, रजनीगंधा, मोगरा आदी फुलांची आवक होत आहे. ८० ते ८५ टक्के फुले अहमदनगर, नाशिक आणि शेजारच्या जिल्ह्यातून येत आहे. स्थानिक फुलांची आवक फक्त १० ते १५ टक्के आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी सणासुदीच्या तोंडावर झेंडूला चांगला भाव मिळेल या आशेने त्याची पेरणी केली आहे. ती फुले सणांच्या दरम्यान, बाजारात येईल. धार्मिक स्थळे सुरू नसल्याने फुलांची मागणी केवळ निम्म्यावर आलेली आहे. आता लग्न सोहळे कमी झाल्यानंतर मागणीत पुन्हा घट होईल.

हेही वाचा: दहावीचा निकाल : अमरावती विभाग ९९.९८ तर नागपूर ९९.८४ टक्के

लग्नसमारंभामुळे कोमजलेल्या फुलांच्या बाजारात सध्या चैतन्य आले आहे. तेही आता संपेल. त्यानंतर मंदिरे उघडल्यास श्रावण आणि सणासुदीच्या तोंडावर फुलांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी फूलशेतीचे क्षेत्रफळ वाढले आहे. त्यामुळे यावर्षी जास्त भाव वाढण्याची शक्यता नाही.

-जयंत नारनवरे, संचालक, अरोमा फ्लॉवर्स

हेही वाचा: नागपूर : मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध; वर्चस्वासाठी राडा

ठोक बाजारात फुलांचे प्रतिकिलो भाव

- झेंडू २५

- शिर्डी गुलाब ८०-१००

- रजनीगंधा ५०-५५

- मोगरा ४५०

- हैदराबाद लंगर ५२५ - ६२५

- डच गुलाब १००-१२५ (२० नग)

- जरबेरा ६० - ७० (१० नग)

loading image