सरकारी रुग्णालये झाले आरोग्य मंदिर, देव देव्हाऱ्यात नाही तर...

सरकारी रुग्णालये झाले आरोग्य मंदिर, देव देव्हाऱ्यात नाही तर...
सरकारी रुग्णालये झाले आरोग्य मंदिर, देव देव्हाऱ्यात नाही तर...

नागपूर : कोरोना विषाणूमुळे जगभरात वणवा पेटला आहे. या जीवघेण्या विषाणूंपासून वाचवण्यासाठी देशातील व राज्यातील जिल्ह्यातील सरकारी रुग्णालये आरोग्य मंदिर बनले आहेत. आरोग्य मंदिरांच्या देव्हाऱ्यातील देव म्हणजे डॉक्‍टर, परिचारिका व सफाई कामगार आहेत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे वैद्यकीय सेवक सरकारी रुग्णालयात हजारो कोरोनाग्रस्तांवर, संशयितांवर उपचार करून सेवाधर्म निभावत आहेत. हे चित्र बघितल्यानंतर देव देव्हाऱ्यात नाही, तर तो सरकारी रुग्णालयातील वॉर्डात रात्रंदिवस राबणाऱ्या डॉक्‍टर, परिचारिकांच्या रूपात दिसतो. आरोग्य दिनाच्या पर्वावर जनतेकडून तुमच्या त्यांच्या सेवाधर्माला सलाम... 

कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. रस्ते निमर्नुष्य व कंपन्या बंद आहेत. सारे बंद असतानाही केवळ सरकारी डॉक्‍टर, परिचारिका, रुग्णालयातील परिचर, सफाई कामगार ऑनड्युटी 24 तास आहेत. कोरोनाबाधितांसह संशयितांवर औषधोपचार, रुग्णालयाची स्वच्छता करणारे सेवक कर्तव्य निभावत आहेत. विशेष असे की, औषधौपचाराचा सेवाधर्म निभावताना राज्यभरातील चारशेवर डॉक्‍टर, परिचारिका, सफाईकामगार, परिचर यांना कोरोनाने विळख्यात घेतले. मात्र, अशाही स्थितीत सरकारी रुग्णालयातील हे देवदूत जिवावर उदार होऊन जनतेच्या आरोग्यासाठी झटत आहेत. 

डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची सेवा

दुसऱ्या महायुद्धावेळी चीन आणि जपान एकमेकांविरुद्ध लढले होते. त्यावेळी एका भारतीय डॉक्‍टरने आपले प्राण धोक्‍यात घालून अनेक चिनी सैनिकांचे प्राण वाचवले होते. डॉक्‍टर द्वारकानाथ शांताराम कोटणीस हे त्यांचे नाव. जपान आणि चीनमधले युद्ध पेटल्यानंतर चीनचे अनेक सैनिक जखमी झाले. त्यापैकी अनेकांना प्लेगची लागण झाली होती. त्यांना वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशाने भारतीय वैद्यक मिशनने एक टीम चीनला पाठवली. त्या टीममध्ये डॉ. कोटणीस होते. 

परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेलचा त्याग

रुग्णसेवेला खऱ्या अर्थाने फ्लॉरेन्स नाईटिंगेल या परिचारिकेपासून सुरुवात झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी त्यांनी जखमी सैनिकांची शुश्रूषा केली. त्यांनी सुरू केलेल्या नर्सिंग स्कूलमुळेच आज जगभरात परिचारिकांना महत्त्व प्राप्त झाले. 1854 ते 1856 या काळात तुर्कस्थान आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू होते. त्यानंतर झालेल्या क्रिमिया युद्धात जखमी झालेल्या सैनिकांवर कंदिलच्या प्रकाशात उपचार करून देण्याचे फ्लॉरेन्स नाईटिंगेल या इंग्लिश घराण्यातल्या मुलीने केले. म्हणूच फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिन परिचारिका दिन म्हणून जगभरात साजरा होतो. 

बाधा होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही 
मेडिकल-मेयोच्या कोरोना कक्षात रुग्णसेवा देत असताना येथे कार्यरत डॉक्‍टर, परिचारिका, परिचर, सफाई कामगार या कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. परंतु हे सत्य स्वीकारून योग्य ती खबरदारी घेत रुग्णसेवेचा वसा इमाने इतबारे निभावत आहेत. 
- डॉ. अविनाश गावंडे
वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल.


जीव वाचवण्यासाठी प्रयत्नशील 
आमचे आभार मानणारे फोन येत आहेत. परंतु, ते आमचे कर्तव्य आहे. आनंदोत्सव असो की, कोणत्याही आजाराची साथ असो, वैद्यकीय सेवेचे व्रत आम्ही स्वीकारले आहे. ती जबाबदारी पार पाडतो. रात्रंदिवस आमचे डॉक्‍टर, परिचारिकांसह सेवांमध्ये नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 
- डॉ. अजय केवलिया, 
अधिष्ठाता, मेयो रुग्णालय.

रुग्णाच्या संपर्कात परिचारिका 
परिचारिका-डॉक्‍टर मेयो, मेडिकलच्या कोरोना वॉर्डात जीवावर उदार होऊन काम करतात. दर दिवसाला या रुग्णाच्या संपर्कात असतात. डॉक्‍टर उपचार करून निघून जातात, मात्र 24 तास रुग्णाच्या संपर्कात परिचारिका असतात. 
- डॉ. मालती डोंगरे, 
परिचर्या अधीक्षक, मेडिकल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com