esakal | पदविका, पदवी, पदव्युत्तरचे प्रथम सत्र परीक्षा महाविद्यालयस्तरावर
sakal

बोलून बातमी शोधा

Exam

पदविका, पदवी, पदव्युत्तरचे प्रथम सत्र परीक्षा महाविद्यालयस्तरावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा विद्यापीठ स्‍तरावर घेण्यात येणार आहे. यावर्षी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशात उशिर झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, पदविका पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रथम सत्रातील नियमित आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन आणि मिक्स मोडमध्ये ५ ते २० मेदरम्यान घेण्यात येणार आहे. तसे वेळापत्रक विद्यापीठाने जारी केले आहे.

हेही वाचा: १५ दिवसांत तब्बल ३४ मृत्यू! गावात स्मशान शांतता

विद्यापीठाद्वारे गेल्या वर्षीच्या हिवाळी परीक्षा मार्च महिन्यापासून सुरू झाल्यात. यामध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या तिसरे, पाचवे, सातवे आणि आठव्या सेमिस्टरच्या समावेश करण्यात आला आहे. यावर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे व्यावसायीक अभ्यासक्रमाचे प्रवेशासाठी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बराच उशिर झाला. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेणे विद्यापीठाला शक्य नसल्याचे दिसून आले. त्यातूनच या परीक्षा महाविद्यालयस्तरावर घेण्याचे विद्यापीठाने ठरविले. मात्र, व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा विद्यापीठस्तरावर घेणे अनिवार्य असल्याने या परीक्षा विद्यापीठ ऑनलाइन पद्धतीने घेणार आहे. बीई, बी.टेक, एलएलबी यासारख्या परीक्षांचा समावेश आहे.

हेही वाचा: आशिया खंडातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयाचं शवागार हाऊसफुल्ल

ऑनलाइन परीक्षेत एससीक्यू, रिक्त जागा भरा, एका वाक्यात प्रश्न अशा चाळीस प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच बहूपर्यायी प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांना सर्व प्रश्न सोडवणे बंधनकारक राहणार आहे. तसेच असायमेंट पद्धतीने ऑफलाइन परीक्षा विद्यापीठाच्या प्रचलित पद्धतीनुसार गुगल फॉर्मवर प्रश्न देऊन घेता येणार आहे. याशिवाय ऑनलाइन परीक्षा घेतेवेळी शासनाने ठरवून दिलेल्या करोना नियमाचे पालन करावे लागणार आहे. गेल्या वर्षी अंतिम वर्ष सोडून आणि एटीकेटीच्या परीक्षा महाविद्यालयस्तरावर घेण्यात आल्या होत्या.