ग्रामीण भागात घराघरांत रुग्ण, पण कोविड केअर सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांचा अभाव

representative image
representative imagee sakal

नागपूर : ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गावातील घराघरांत रुग्ण असल्याचे सांगण्यात येते. शहरातील रुग्णालयांत जागा नाही. ग्रामीण भागात आपत्कालीन उपचाराची सोय नाही. औषधांचा तुटवडा, मनुष्यबळाचा अभाव आहे. कंत्राटी कर्मचारी मिळत नसल्याचे सांगण्यात येते. अशीच स्थिती राहिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

representative image
नागपूरकरांनो सावधान! बाहेर फिरलात तर होणार कोरोना टेस्ट; १८ बाधित विलगीकरणात रवाना

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ कोविड केअर सेंटर सुरू झाले आहेत. हे सेंटरही हाउसफुल्ल असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील काही सेंटरमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था आहे. मनुष्यबळाचा मात्र प्रचंड तुटवडा आहे. जिल्हा परिषदेने डॉक्टर्स, नर्स, फार्मासिस्ट, डाटा एंट्री ऑपरेटर, अटेंडन्स या पदांसाठी जाहिराती दिल्या आहेत. पण, कर्मचारी मिळत नसल्याची स्थिती आहे. एमबीबीएस डॉक्टर सोडाच, बीएएमएस डॉक्टर्ससुद्धा आरोग्य विभागाला मिळत नसल्याचे चित्र आहे. निवड करणारे अधिकारी उमेदवारांना चांगली वागणूक देत नसल्याचा आरोप आधीच पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आला आहे. यामुळेही कर्मचारी मिळत नसल्याची चर्चा आहे.

अधिकार बैठकींमध्ये व्यस्त आहेत. प्रत्यक्ष त्यांचे लक्ष नाही. ग्रामीणच्या आरोग्य व्यवस्थेवर शहरातील यंत्रणा मॉनिटरिंग करीत आहे. मॉनिटरिंग करणारी यंत्रणाही सक्षम नाही. डॉ. योगेंद्र सवई यांच्यासारख्या सक्षम अधिकाऱ्याची गरज आहे.
-व्यंकट कारेमोरे, गटनेते, जिल्हा परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com