esakal | काँग्रेसला अप्रत्यक्षपणे इशारा; युवा सेनेला मनपासाठी सज्ज ठेवणार
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेसला अप्रत्यक्षपणे इशारा; युवा सेनेला मनपासाठी सज्ज ठेवणार

काँग्रेसला अप्रत्यक्षपणे इशारा; युवा सेनेला मनपासाठी सज्ज ठेवणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी-युती करण्याचा अधिकार सेना प्रमुखांना आहे. मात्र, स्वबळावर लढण्याची वेळ आलीच तर युवा सेना सज्ज राहील असे सांगून युवा सेनेचे राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई यांनी महाआघाडीतील घटकपक्ष काँग्रेसला अप्रत्यक्षपणे इशाराच दिला. (Local-body-elections-Youth-Sena-Warning-to-Congress-National-Secretary-Varun-Sardesai-nad86)

युवा सेनेच्या संवाद दौऱ्यासाठी ते बुधवारी नागपूरला आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत युवा सेनेचे मोर्चेबांधणी सुरू करायची असल्याने नागपूर शहर व जिल्ह्याची कार्यकारिणी लगेच जाहीर केली जाणार असल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत खासदार कृपाल तुमाने, रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल, नागपूरचे संपर्क प्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी, महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे, शहर प्रमुख नितीन तिवारी तसेच आदित्य शिरोडकर उपस्थित होते.

हेही वाचा: सत्तांतरानंतर प्रश्न रखडला; पाच एव्हरेस्टवीर नोकरीच्या प्रतीक्षेत

युवा सेनेचा मुंबई आणि मराठवाड्याचा संवाद दौरा आटोपला. प्रत्येक भागात मोठा प्रतिसाद मिळत असून, कार्यकारिणीतही मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यातील ॲक्टिव कार्यकर्त्यांना प्रमोशन दिले जाईल तर निष्क्रिय आहेत त्यांना बाजूला सारले जाईल. युवासेनेच्या बुथ आणि प्रभागनिहाय समित्याही स्थापन केले जातील. जे वादग्रस्त पदाधिकारी असतील त्यांच्यावर कारवाईसुद्धा केली जाईल, असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

विदर्भातील ग्राम पंचायत निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश लाभले आहे. हे आमच्यासाठी चांगले संकेत आहेत. उद्धव ठाकरे यांची देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या कारभारावरही राज्यातील नागरिक समाधानी असल्याचे दिसून येते. स्वच्छ प्रतिमा आणि त्यांचा स्पष्टवक्तपणा जनतेला भावला आहे. त्यामुळे त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचेही सरदेसाई यांनी सांगितले.

हेही वाचा: ...अन् बघता बघता गर्दीचाच झाला सिनेमा! उसळली बघ्यांची गर्दी

संपर्क प्रमुख नेमणार

नागपूर तसेच विदर्भाला शिवसेनेतून ताकद दिली जात नाही. उपेक्षित ठेवले जाते या आरोपांवर देसाई यांनी कोरोनामुळे विदर्भाकडे थोडे दुर्लक्ष झाल्याचे मान्य केले. मात्र, यापुढे असे घडणार नाही. मुंबईतील एका युवा नेत्याची संपर्क प्रमुख म्हणून निवड केली जाईल. दर महिन्याला किमान एक आठवडा नेमून दिलेल्या जिल्ह्यात त्याला घालवणे बंधनकारक केले जाईल, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

(Local-body-elections-Youth-Sena-Warning-to-Congress-National-Secretary-Varun-Sardesai-nad86)

loading image