वर्धा अपघात : आज काळीज..., मुलाच्या मृत्यूनंतर आमदाराची भावूक पोस्ट

या अपघातात सावंगी येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेले सात विद्यार्थी जागीच ठार झाले.
Avishkar Rahangdale
Avishkar Rahangdale Google

वर्धा : वर्ध्यात कार पुलाखाली (BJP MLA Son Dies In Car Accident) कोसळून झालेल्या अपघातामध्ये भाजपचे आमदार विजय रहांगडाले (MLA Vijay Rahangdale ) यांच्या मुलासह सात जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, एकुलत्या मुलाच्या अपघाती निधनानंतर आमदार विजय रहांगडाले यांनी फेसबुकवर मुलाच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. (MLA Vijay Rahangdale Post After Son Death)

मित्राचा वाढदिवस (Birthday Celebration) साजरा करून परत येत असताना भरधाव मोटार पुलाचा कठडा तोडून सेलसुरा येथील भदाडी नदीत (Car Fall Down In Bhadadi River) कोसळली. या भीषण अपघातात सावंगी येथील महाविद्यालयात (Medical Student Dies In Road Accident In Wardha) वैद्यकीय शिक्षण घेत असलेले सात विद्यार्थी जागीच ठार झाले. ही घटना मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास घडली. मृतांमध्ये तिरोडा (जि. गोंदिया) येथील भाजप आमदार विजय रहांगडाले (MLA Vijay Rahangdale) यांचा एकुलता मुलगा आविष्कार रहांगडाले याच्यासह नीरज चव्हाण (वय २२), प्रत्युशसिंग हरेंद्रसिंग (वय २३), शुभम जयस्वाल (वय २३, तिघेही रा. उत्तर प्रदेश)नीतेश सिंग (वय २५, रा. ओडिशा), विवेक नंदन (वय २३), (७) पवनशक्ती (वय १९, दोघेही रा. बिहार) यांचा मृत्यू झाला.

Avishkar Rahangdale
वर्धा अपघात : PM मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत

प्रत्येक शब्द मांडताना डोळ्यात आश्रू

दरम्यान, आमदार विजय रहांगडाले (BJP Vijay Rahangdale) यांच्यासोबत खूप जवळचे संबंध आहेत. ते नागपूरला आले की नेहमी भेटतात. हक्कानं माझ्या घरी येतात. अविष्कारला फोटोग्राफीची (Photography) आवड होती. हे धडे तो माझ्याकडून घ्यायचा. आज कविता (MLA Vijay Rahangdale Facebook Post) लिहित असताना सतत अविष्कारचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. एक एक शब्द मांडत होतो तसं रडायला येत होतं, अशा भावना कवितेचे शब्दांकन करणारे राकेश साठवणे यांनी व्यक्त केल्या आहेत.

Avishkar Rahangdale
ओमिक्रॉनमुळे विकसित अँटीबॉडीबाबत ICMR चे महत्त्वाचे विधान म्हणाले...

PM मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत

वर्ध्यात कार पुलाखाली कोसळून सात जणांचा मृत्यू (Wardha Accident News) झाला. यामध्ये भाजप (BJP) आमदाराच्या मुलाचा समावेश होता. याची दखल थेट पंतप्रधान मोदींनी देखील (PM Modi) घेतली असून, या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मोदी PMNRF मधून प्रत्येकी दोन लाखांची मदत करण्यात येणार आहे. तसेच जखमींना ५० हजार रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com