वर्धा अपघात : PM मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत

Pm Narendra Modi
Pm Narendra ModiTeam eSakal
Updated on

वर्धा : वर्ध्यात कार पुलाखाली कोसळून सात जणांचा मृत्यू (Wardha Accident News) झाला. यामध्ये भाजप (BJP) आमदाराच्या मुलाचा समावेश आहे. याची दखल थेट पंतप्रधान मोदींनी (PM Modi) घेतली असून आता या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मोदी PMNRF मधून प्रत्येकी दोन लाखांची मदत करणार आहेत. तसेच जखमींना ५० हजार रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे.

Pm Narendra Modi
वर्ध्यात कार अपघातात ७ जण ठार; मृतांमध्ये भाजप आमदाराचा मुलगा

पंतप्रधान कार्यालयाकडून माहिती -

वर्ध्यातील सेलसुरा गावाजवळ झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये मदत PMNRF मधून देण्यात येणार आहे. तसेच जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे.

मोदींकडून शोक व्यक्त -

महाराष्ट्रातील सेलसुराजवळ झालेल्या अपघातामधील जीवितहानीमुळे मला दुःख झालं असून ज्यांनी आपले जवळचे नातेवाईक गमावले त्यांच्यासोबत मी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो आणि जखमी लोक लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करता, असं ट्विट करत पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे.

वर्ध्यात सेलसुरा शिवारातील जुन्या आणि नवीन पुलाच्यामध्ये दरीत कार ४० फूट कोसळल्याने भीषण अपघात झाला. देवळीहून वर्ध्याला परत येत असताना झायलो कार पुलावरून नदीत कोसळल्याचं समोर आलं. मध्यरात्री दीडच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये तिरोड्याचे भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कारचा समावेश आहे.

इतर मृतांची नावे -

  • निरज चौहान (वय 22, रा. गोरखपुर, उ. प्रदेश),

  • अविष्कार विजय रहागडाले (वय 21 रा. गोंदिया),

  • नितेशसिंग (वय 25, रा. ओडिशा)

  • विवेक नंदन (वय 23 रा. गया, बिहार)

  • प्रत्युशसिंह हरेन्द्रसिंह (वय 23 रा. गोरखपुर, उ.प्रदेश),

  • शुभम जयस्वाल (वय 23 रा. दिनदयाल उपाध्याथ नगर, उ,.प्रदेश),

  • पवनशक्ती (वय 19, रा.गया बिहार) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

maharashtra Latest Marathi News Live Update
West Bengal new chief minister 2026
Who is Suvendu Adhikari?
How TVK Emerged as Largest Party in Tamil Nadu
Marathi News Esakal
www.esakal.com