भावना अनावर : ‘जावई आपला घात करेल’ असे लक्ष्मी नेहमी म्हणायची

भावना अनावर : ‘जावई आपला घात करेल’ असे लक्ष्मी नेहमी म्हणायची

नागपूर : जवळचे म्हणता येईल अशा सर्वांचाच जावयाने खात्मा केला. नाईट ड्युटीमुळे घराबाहेर असलेले सासरे देवीदास बोबडे एकटेच बचावले. सर्वत्र गर्दी असूनही विलापासाठी त्यांना एकही जवळचा खांदा मिळू शकला नाही. पानावलेल्या डोळ्यांनी त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. जावई एक दिवस आपला घात करेल असे लक्ष्मी म्हणायची, हा शब्द त्याने खरा करून दाखवला, असे सातत्याने पुटपुटत ते सांगत होते. (Murder-of-five-members-of-the-same-family-in-Nagpur)

वयोवृद्ध असणारे देवीदास खासगी काम करून संसाराचा गाडा खेचत होते. रविवारी रात्री ते ड्युटीवर गेले होते. घरात भयानक आक्रीत घडेल याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. साहिल आणि परी या नातवांवर त्यांचा भारीच जीव होता. त्यांच्यासाठी नेहमीच खाऊ आणायचे. सोमवारी सकाळी कामावरून घरी परतले त्यावेळी पत्नी आणि मुलगी गदीवरच होत्या. अंगावर ब्लँकेट असल्याने त्या झोपल्या असल्याचा त्यांचा समज झाला. ते घराबाहेर पडले, बिल भरण्यासह अन्य कामे उरकून घेतली.

भावना अनावर : ‘जावई आपला घात करेल’ असे लक्ष्मी नेहमी म्हणायची
कोविडनंतर लैंगिकविकाराची समस्या; वाचा काय सांगतात डॉ. चक्करवार

नातवांच्या भेटीसाठी ते विजयाकडे गेले. त्यावेळी शेजाऱ्यांकडून दार तोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याने बाहेरूनच सर्वस्व गमावल्याचे लक्षात आले. घराच्या आत शिरण्याची हिंमत झाली नाही. थेट स्वतःच्या खोलीत गेले. निघ बघीतले असता पत्नी आणि मुलगीही रक्ताच्या थारोळ्यात असल्याचे दिसले. लागलीच आल्या पावली परतले.

भांबावलेल्या अवस्थेत ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी चकरा मारीत होते. तोंडातून बोल फुटणेही कठीण झाले होते. दोन्ही घरांसमोर प्रचंड गर्दी असली तरी त्यांना धीर देणारा किंवा भावना मोकळ्या करता येईल असा एसही खांदा गवसला नाही. आईजवळच मुलीचा मृतदेह असून अंगावर टिशर्ट शिवाय काहीच नसल्याचे लोक सांगत होते. लोकांकडून कळणारी एक एक माहिती त्यांना खोलखोल जखमा देणारी ठरत होती.

भावना अनावर : ‘जावई आपला घात करेल’ असे लक्ष्मी नेहमी म्हणायची
शिवसेनेचा भाजपला दे धक्का; दहा नगरसेवक फोडले

बराच वेळ गर्दीतच उभे राहून तो स्वतःशीच बोलत होते. जावई असल्याने त्याचे (आलोक) घरी जाणे येणे होते. पण, सारेच त्याचा तिरस्कार करायचे. तो एक दिवस आपला घात करील असे अनेकदा लक्ष्मीने बोलून दाखवल्याची आठवण सांगतानाच सारेच संपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

(Murder-of-five-members-of-the-same-family-in-Nagpur)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com