Nagpur: ५७ वर्षीय व्यक्ती यकृताच्या प्रतीक्षेता होती अन्... शेतकऱ्याच्या अवयवदानातून तिघांना नवजीवन

मध्यप्रदेशातील शिवणी येथील शेतकरी गणेश सवाई १४ ऑगस्टला शेतातून काम करून घरी येत होते. अचानक दुचाकीवरून तोल गेला आणि खाली पडले.
Nagpur
NagpurSakal

नागपूर - समाजभान राखून शेतकरी कुटुंबाने दुःखाचा डोंगर बाजूला सारत अवयवदानाला संमती दिली आणि यकृत आणि किडनी दानातून तिघांना जीवनदान दिले. मध्यप्रदेशातील शेतकरी गणेश सवाई यांनी अवयवदान करून जगाचा निरोप घेतला समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला.

मध्यप्रदेशातील शिवणी येथील शेतकरी गणेश सवाई १४ ऑगस्टला शेतातून काम करून घरी येत होते. अचानक दुचाकीवरून तोल गेला आणि खाली पडले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.

पांढुर्णा येथील रुग्णालयातून त्यांना नागपूरच्या एम्समध्ये रेफर केले गेले. उपचारादरम्यान त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला. यामुळे त्यांची तपासणी डॉ. भारत सिंग राठोर, डॉ. वरिध कटियार

Nagpur
Nagpur Rain News : उसंतीनंतर पावसाचे दमदार कमबॅक

शेतकऱ्याच्या अवयवदानातून तिघांना नवजीवन

आणि न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. मनीष श्रिगीरीवार यांनी केली. मेंदूपेशी मृत झाल्याचे निदान झाल्यानंतर समन्वयक प्रीतम त्रिवेदी आणि प्राची खैरे यांनी अवयवदानासाठी शेतकरी कुटुंबाचे समुपदेशन केले.

शेतकऱ्याची पत्नी राधिका सवाई आणि १९ वर्षांचा मुलगा विशाल यांनी अवयवदानाला संमती दिली. यानंतर विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते, सचिव डॉ. राहुल सक्सेना यांना सूचना दिली. समितीचे समन्वयक दिनेश मंडपे यांनी प्रतीक्षा यादी तपासली. त्यानुसार गणेश यांचे अवयवदान करण्यात आले.

Nagpur
Pune News : प्रशासकीय गतिमानता अभियानाची पुणे विभागात आजपासून स्पर्धा

तिघांना मिळाले नवजीवन

न्यू इरा हॉस्पिटलमध्ये ५७ वर्षीय व्यक्ती यकृताच्या प्रतीक्षेत होते. गणेश यांच्या यकृत दानातून त्यांचा जीव वाचला. तर एम्समध्ये किडनी दानाच्या प्रतीक्षेतील ५० वर्षीय व्यक्तीला गणेश यांची किडनी देण्यात आली.

दुसरी किडनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रतीक्षेतील ५४ वर्षीय व्यक्तीला देण्यात आली. अशाप्रकारे गणेश यांनी तिघांचा जीव वाचविला. तर महात्मे नेत्रपेढीला नेत्रदान करण्यात आले. यातून दोन अंधांना दृष्टीही मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com