Nagpur Congress: आणखी एका नेत्याचा काँग्रेसला बाय बाय! केदारांचे खंदे समर्थक भाजपात,या गोष्टीला कंटाळून घेतला निर्णय

निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला पुन्हा एक धक्का बसला. आमदार राजू पारवेनंतर माजी मंत्री सुनील केदार यांचे खंदे समर्थ मनोहर कुंभारे यांनी कॉंग्रेसला हात दाखवत भाजपमध्ये प्रवेश केला.
Nagpur Congress
Nagpur CongressEsakal

Sunil Kedar Supporter Manohar Kumbhare Joins BJP: निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला पुन्हा एक धक्का बसला. आमदार राजू पारवेनंतर माजी मंत्री सुनील केदार यांचे खंदे समर्थक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी कॉंग्रेसला हात दाखवत भाजपमध्ये प्रवेश केला.

कुंभारे यांच्या माध्यमातून भाजपने केदारांवरच नेम साधल्याची चर्चा होत आहे. याचा ग्रामीण भागातील राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. येणाऱ्या विधानसभेत त्यांना सावनेरमधून उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. कुंभारे गेल्या अनेक दशकांपासून केदार यांच्यासोबत आहेत. ते त्यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांनी अचानकपणे भाजपमध्ये प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते.

गेल्या महिन्यांपासून जिल्हा परिषदेत त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळेच त्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याची चर्चा होत आहे. लोकसभा निवडणुकीत याचा कॉंग्रेसला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत कुंभारे जिल्हा परिषद सदस्यांसोबत होते. त्यानंतर सकाळी त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. रात्रीच त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

गटबाजीला कंटाळलो

पक्ष सोडल्यानंतर मनोहर कुंभारे यांनी सुनील केदारांवर निशाणा साधला. केदार यांच्या गटा-तटाच्या राजकारणाचा फटका विकासाला बसला. धनोजे कुणबी समाजावर अन्याय होत असल्याने सावनेरच्या विकासासाठी मोठा निर्णय घ्यावा लागला, असे कुंभारे यांनी सांगितले. पदाची लालसा नसून सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करीत राहणार असल्याचे कुंभारे यांनी सांगितले.

Nagpur Congress
Electoral Bond: 'इलेक्टोरल बाँड हा जगातील सर्वात मोठा घोटाळा', निर्मला सीतारामन यांच्या पतीचे वक्तव्य चर्चेत

गडकरींच्या घरी प्रवेश

बुधवारी सकाळी मनोहर कुंभारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी एका छोटेखानी कार्यक्रमात भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. नितीन गडकरी आणि सुनील केदार यांचे यांचे संबंध चांगले आहेत. निवडणुकीत अप्रत्यक्षणपणे एकमेकांना साथ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याच्याच घरीच प्रवेश करून एकप्रकारे फडणवीस यांनी गडकरींवर राजकीय कुरघोडी केल्याची चर्चा होत आहे. )

Nagpur Congress
Arvind Kejriwal : केजरीवालांना आणखी सात दिवसांच्या कोठडीची ईडीकडून मागणी; आजची सुनावणी पूर्ण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com