नागपूरात मानव तस्करीचे रॅकेट पकडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

नागपूरात मानव तस्करीचे रॅकेट पकडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बांगलादेशातून गुजरातमध्ये तरुणी आणि महिलांसह मुलांची तस्करी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना नागपूर गुन्हे शाखा आणि एटीएसने ताब्यात घेतल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचा भंडाफोड करण्यात पोलिसांना यश आले आहे. तस्कराकडून दोन तरुणींसह नऊ महिला, तीन मुले व एका युवकाची सुटका केली. सर्वजण बांगलादेशचे नागरिक असून, त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

हावडा- मुंबई गितांजली एक्सप्रेसने काही बांगलादेशी नागरिक नागपुरात येत असून त्यांना बळजबरीने मुंबईमार्गे गुजरातला नेण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली. आयुक्तांनी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित यांना कारवाईचे निर्देश दिले. डीसीपी चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेचे दोन पथक, एटीएसचे पोलिस निरीक्षक प्रदीप अतुलकर, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक कविता ईसारकर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वर मिळालेल्या माहितीनुसार सज्ज होते.

हेही वाचा: ममतांचे आमंत्रण मोदींनी स्वीकारले

मात्र, गितांजली एक्सप्रेस आपल्या निर्धारीत वेळेपेक्षा उशीरा धावत होती. हावड्याहून मुंबईला जाणारी गाडी फलाटावर आली. पोलिसांनी संपूर्ण डब्याची तपासणी केली. शेवटच्या डब्यात दोन तरुणींसह नऊ महिला, तीन मुले व पुरूष संशयास्पदस्थितीत आढळले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली आणि ताब्यात घेतले. त्यासर्वांना गिट्टीखदानमधील गुन्हे शाखा कार्यालयात नेण्यात आले. त्यांची सविस्तर चौकशी केली असता सर्वजण बांगलादेशमधील जेसोर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणींना देहव्यापारासह व अन्य नागरिकांना मजुरीसाठी गुजरातमधील सुरत व अन्य शहरांमध्ये पाठविण्यात येत असल्याची चर्चा आहे. या प्रकरणात बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पोलिस बांगलादेशी नागरिकांची कसून चौकशी करीत आहेत.

बांगलादेशाच्या दुतावासाशी संपर्क

बांगलादेशी नागरिकात २५ ते ६५ वयोगटातील नागरिक आहेत. ते दोन दिवसांपूर्वीच हावड्याला आले. यात काही मजुर असल्याचे सांगण्यात येते. ते मुंबईमार्गे सुरतला जाणार होते. दरम्यान गुन्हे शाखेचे पोलिस बांगलादेशाच्या दुतावासाशी संपर्क साधत आहेत. त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट मात्र भारताचे !

गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेले सर्व नागरिक बांगलादेशातील रहिवाशी आहेत. मात्र, त्यांच्याकडे भारतातील पॅनकार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड सापडले आहे. त्यामुळे या मानवतस्करीत बनावट कागदपत्रे बनविणाऱ्या टोळीचे कनेक्शन असल्याची चर्चा आहे.

loading image
go to top