

Nagpur Mihan Gate Incident
esakal
नागपूर : मिहानमधील इंडेमार एव्हिएशनच्या विमान देखभाल-दुरुस्ती प्रकल्पातील लोखंडी गेट दोन सुरक्षा रक्षकांच्या अंगावर कोसळले. त्यात एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी आहे. शनिवारी सकाळी विमान आत घेण्यासाठी लोखंडी गेट उघडताना ही घटना घडली. कैलास पुंडलिकराव चाफेकर (वय ४६, रा. देवळी, हिंगणा) असे मृत सुरक्षा रक्षकाचे, तर अभिषेक सुखदेव सांगोडे (वय २५, रा. कळमना) असे जखमीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीलगत मिहान सेझमध्ये इंडेमारचा प्रकल्प आहे. विमानात तांत्रिक बिघाड असल्याने देखभाल-दुरुस्तीसाठी ते प्रकल्पात आणण्यात आले होते. ते आत घेण्यासाठी सकाळी १०.१५ ते १०.३० दरम्यान एच-१ लोखंडी प्रवेशद्वार उघडण्यात येत होते. त्यावेळी परिसरात सहा सुरक्षा रक्षक तैनात होते. गेटचा एक भाग जवळच उभे असलेले कैलास चाफेकर आणि अभिषेख सांगोडे यांच्या अंगावर कोसळला. दोघेही गेटखाली दबून गंभीर जखमी झाले.
माहिती मिळताच सोनेगाव पोलिस घटनास्थळी पोहोचले. अन्य कामगारांच्या मदतीने गेट बाजूला करून दोघांना तातडीने एम्समध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी कैलास चाफेकर यांना मृत घोषित केले. सांगोडे यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
बंदुकीच्या धाकावर भरदुपारी दरोडा एका दरोडेखोराने पिस्तूल रोखून धमकावले. इतरांनी तिजोरीतील तसेच शुभमजवळ असलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि त्याचा मोबाइल बॅगमध्ये भरला. त्यानंतर आरोपी मोटारसायकलवरून नागपूरच्या दिशेने पळून गेले. माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिस उपायुक्त ऋषिकेश सिंगारेड्डी, सहाय्यक पोलिस उपायुक्त यशवंत नरवाडे यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
विमान, हेलिकॉप्टरची होते देखभाल इंडेमार एव्हिएशनकडून विमाने आणि हेलिकॉप्टरच्या देखभाल, दुरुस्तीची कामे केली जातात. कंपनीचे एमआरओ हँगर नागपूरच्या मिहान सेझसह नवी दिल्ली येथे आहे. विविध प्रमुख विमान उत्पादकांच्या विमानांना कंपनीकडून तांत्रिक सेवा पुरविली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.