महापालिकाही करणार लस खरेदी, मुख्यमंत्र्यांना मागितली परवानगी

corona vaccination
corona vaccinationcorona vaccination

नागपूर : कोरोनाची (coronavirus) तिसरी लाट अतिशय धोकादायक असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तिसऱ्या लाटेपूर्वी संपूर्ण नागपूरकरांचे लसीकरण (corona vaccination) व्हावे, यासाठी महापालिकेने (nagpur municipal corporation) लस खरेदीचा निर्धार केला. राज्य सरकारने लस खरेदीसाठी परवानगी द्यावी, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना पाठविण्यात आल्याचे महापौर दयाशंकर तिवारी (nagpur mayor dayashankar tiwati) यांनी आज सांगितले. (nagpur municipal corporation write letter to cm for vaccine purchase permission)

corona vaccination
टूरच्या नावाने सव्वादोन लाखांनी फसवणूक; पोलिसांत तक्रार

केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या लसीसोबतच महापालिकाही लस खरेदी करणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा कोटी खर्च करण्याची तयारी असल्याचे महापौर तिवारी यांनी सांगितले. आणखी खर्च लागल्यास तोही खर्च करण्यास महापालिका समर्थ असल्याचा दावा महापौर तिवारींनी केला. लस खरेदीसाठी नगरसेवकांना त्यांच्या निधीतून प्रत्येकी दहा लाख रुपये महापौर सहायता निधीत देण्याची विनंती करण्यात आली आहे. यातून १५ कोटी मिळतील, असे गणितही महापौरांनी मांडले. याशिवाय शहरातील खासदार, आमदारांनाही पत्र देण्यात आले असून यातूनही १५ कोटी मिळण्याची शक्यता आहे. या निधीतून १० लाख डोसची सुविधा होणार असून पाच लाख नागरिकांना दोन डोस देणे शक्य होणार आहे, असे महापौरांनी सांगितले.

नागपूर व विदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा...

नागरिकांनी मदत द्यावी -

लसीची किंमत खासगीमध्ये सहाशे रुपये आहे. नागरिकांनी महापालिकेकडून मोफत लस घ्यावी, परंतु, त्यांनी शक्य तेवढी मदत महापौर सहायता निधीत करावी. महापौर सहायता निधी, बँक ऑफ महाराष्ट्रच्या खाते क्रमांक ६०३४६५५४१३१ मध्ये जमा करावी, असे आवाहन महापौरांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com