Nagpur News : जुन्या मुलाखतीचा दाखला देत मोदींवर अनिल देशमुखांचा निशाना

राष्ट्रवादीच्या मासिकात दिलेल्या मुलाखतीची हेडलाईनच “ पवारांचे प्रत्येक पाऊल शेती व शतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेनेच – नरेंद्र मोदी” ही होती.
anil deshmukh
anil deshmukh sakal

नागपूर - डिसेंबर २०११ मध्ये शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्य राष्ट्रवादी मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे यांनी मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती. देशाच्या कृषी क्षेत्रात शरद पवार साहेबांच्या योगदानाबदल तर त्यांनी सांगीतलेच, परंतु गुजरात राज्याच्या कृषी क्षेत्रात शरद पवार यांनी काय योगदान दिले त्याचा सुध्दा उल्लेख यांनी या मुलाखतीत केला आहे. मात्र गुरुवारी शिर्डी येथील एका कार्यक्रमात त्यांनी शरद पवार यांचे कृषी क्षेत्रात काहीच योगदान नसल्याचे बोलले. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री यांनी मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मुलाखतीचा दाखला देत त्यांवर निशाना साधला आहे.

मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मुलाखती मधील गुजरातला काय दिले यासंदर्भातील काही महत्वाचे मुदे खालील प्रमाणे

१. राष्ट्रवादीच्या मासिकात दिलेल्या मुलाखतीची हेडलाईनच “ पवारांचे प्रत्येक पाऊल शेती व शतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेनेच – नरेंद्र मोदी” ही होती.

२. श्री. शरद पवार यांना ७२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना त्यांच्याबदृल कोणत्याही सत्याचा विपर्यास न करता मी ऐवढेच म्हणेन “ वे विकास के प्रति प्रतिबध्द है | वर्तमान में राजनितीक क्षेत्र में जो छुआछुत का माहौल प्रवेश हुआ है उससे वो पुरी तरह परे है | वो सबको स्वीकार करते है ये बहुत बडी बात है | कृषी, किसान और गाँव के विकास के प्रति उनका लगाव है | उनका हर कदम उस ही दिशा में दिखाई देता है |” ( संदर्भ – राष्ट्रवादी मासिक पान क्र. २६)

३. शेतीमालाच्या किमान आधारभुत किंमतीमध्ये वाढ करुन देण्यासाठी कृषीमंत्री या नात्याने केंद्रीय मंत्रीमंडळात शरद पवार यांनी जो संघर्ष केला त्याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यांचा सातत्याचा आग्रह व दबाव यामुळेच या किंमतीमध्ये लक्षणीय वाढ होउ शकली आहे हे सत्य नाकारता येत नाही. त्यामुळे ते शेतकऱ्यांचे मसिहा वा प्रेषित ठरतात. ( संदर्भ – राष्ट्रवादी मासिक पान क्र. २६)

४. गुजरात हे राज्य शेतीच्या क्षेत्रात देशात पहिल्या क्रमांकावर नेउन ठेवले आहे. यासाठी आम्हाला सर्वतोपरी मदत केंद्रीय कृषीमंत्री श्री. शरद पवार यांनी केली. पक्षाच्या आणि राज्याच्या सीमा ओलांडुन व मन अत्यंत विशाल करुन दूरदुष्टी ठेवून त्यांनी आम्हाला अनेक योजनांचा फायदा मिळवून दिला. त्यामुळेच आज आमच्या राज्याचा कृषी विकासाचा दर हा १६ टक्क्यांपर्यंत आणि सरासरी विकास दर १० टक्क्यांपर्यंत जाउन पोहोचला आहे. ( संदर्भ – राष्ट्रवादी मासिक पान क्र. २१)

anil deshmukh
Anil Deshmukh: 'त्यांनीच जीआर काढला अन् त्यांनीच रद्द केला...', माजी गृहमंत्र्यांचा फडणवीसांवर पलटवार

५. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही केंद्रातुन यासाठी खुप मोठया प्रमाणात अनुदान आम्हाला आरकेवाय व इतर योजनांमधुन उपलब्ध करुन दिलेले आहे. त्यामुळे येत्या ५-१० वर्षांत आमच्या राज्यातील १०० टक्के उस हा ठिंबक व तुषार सिचंनाखाली गेलेला असेल असा मला विश्वास आहे. ( संदर्भ – राष्ट्रवादी मासिक पान क्र. २३)

६. आता मला राज्यात उत्पादित होणाऱ्या शेतीमालावर मूल्यवृध्दी करुन हवी आहे. त्यासाठी मोठया प्रमाणात शेतमाल प्रक्रिया विभागही श्री. शरद पवार यांच्याकडेच असून त्यांनी या कामात मला सहकार्य करण्याचे मान्य केलेले आहे व यासाठी ते मदतही करत आहेत. ( संदर्भ – राष्ट्रवादी मासिक पान क्र. २४)

७. एरंडीच्या संधोधनावर लक्ष केंद्रीत केलेले आहे आणि यासाठी पवार साहेबांनी एक विशेष कार्यक्रम आमच्या राज्याला प्रोत्साहन म्हणून मंजूर केलेला आहे. ( संदर्भ – राष्ट्रवादी मासिक पान क्र. २४)

८. नवनविन गोष्टींचा वापर व संशोधन करणे आणि शरद पवार या दोघांचाही मूळ स्वभाव आहे आणि त्यामुळेच वैचारिक बैठकही भक्कम व एका पातळीचरती राहू शकते. ( संदर्भ – राष्ट्रवादी मासिक पान क्र. २५)

९. आमचे शेतकरी फिनलॅन्डच्या कंपन्यांशी करार करुन टिश्युकल्चरची केळीची रोपे तयार करीत आहेत. या सर्व फळबाग शेतीला नॅशनल हॉर्टिकल्चरल मिशनमधून ताकद देण्याचे काम पवार साहेब करीत आहेत. ( संदर्भ – राष्ट्रवादी मासिक पान क्र. २५)

anil deshmukh
Nagpur News:लॉकरमधील पैसे सोंटू पाठविणार होता दुबईला? पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचाही होता इरादा

१०. कृषीउत्पन्न बाजारसमिती कायद्यामध्ये पवार साहेबांनी जे जाणिवपूर्वक बदल केंद्राच्या पातळीवरुन घडवून आणले आणि राज्यांना आपापल्या बाजार कायद्यांमध्ये बदल करण्यास जे भाग पाडले त्याचा खूप मोठा फायदा आज आमच्या गुजरात राज्याला होतो आहे. नविन इन्फ्रास्ट्रक्चर व तंत्रज्ञान नेटवर्क उभे राहण्याच्या दृष्टीने मोठा हातभार लागला आहे. यासाठी मोठया प्रमाणावर आर्थिक मदत केंद्रातून मिळाली. ( संदर्भ – राष्ट्रवादी मासिक पान क्र. २५)

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com