Nagpur : खड्डे परवडले, पण सिमेंट रस्ते नको रे बाबा! शंकरनगरातील नागरिकांची भूमिका

मागील २३ सप्टेंबरला आलेल्या पूराचे पाणी शंकनगरापर्यंत पोहोचले होते.
cemnet rod
cemnet rod sakal

नागपूर - महापालिकेने शंकरनगरमध्ये जुने डांबरी रस्ते खोदून नवीन सिमेंट रस्ते तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या परिसरातील घरे जुनी सद्यस्थितीतील डांबरी रस्त्यांच्या तुलनेत खोलगट भागात असून, सिमेंट रस्ते आणखी उंच झाल्यास पावसाचे पाणी घरात शिरेल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली. डांबरी रस्ते दुरुस्त नाही केले तर खड्ड्यातून प्रवास करू, पण सिमेंट रस्ते नको, अशी ताठर भूमिका येथील नागरिकांनी घेतली आहे.

मागील २३ सप्टेंबरला आलेल्या पूराचे पाणी शंकनगरापर्यंत पोहोचले होते. पावसाचे पाणीही अनेकांच्या घरांमध्ये शिरले. शंकरनगरातील नागरिकांतही पूराची चांगलीच धडकी भरली असल्याचे चित्र आहे. शंकरनगर वस्तीमध्ये सध्या डांबरी रस्ते असून दयनीय स्थितीत आहे. पावसाळी पाणी वाहूने जाणाऱ्या नाल्यांची दुरवस्था झाली आहे.

अनेक भागांत सद्यस्थितीतील रस्त्यांची उंची पेवब्लॉकपेक्षा उंच आहे. महापालिकेने शंकरनगर भागात शेपअप जिम्नॅशिअम ते वेस्ट हायकोर्ट रोड बाभुळकर हॉस्पिटलपर्यंत सिमेंट रस्त्यांचा प्रस्ताव तयार केला आहे. परंतु सिमेंंटीकरणामुळे रस्त्यांची उंची आणखी वाढेल, सोबतच डोकेदुखीही वाढेल, असे या परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.

cemnet rod
Nagpur Sport : रितिक, तेजस्विनी अर्ध मॅरेथॉनमध्ये विजेते

या परिसरातील नागरिकांनी ही बाब आमदार विकास ठाकरे यांच्याही निदर्शनास आणून दिली आहे. सध्या सिमेंट रस्त्यांपूर्वी परिसरात सिवेज लाईन टाकण्याचे काम सुरू झाले आहे. या भागातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. महापालिकेने २०१४ च्या निवडणुकीनंतर येथील रस्त्यांची दुरुस्ती केली होती. त्यानंतर कधीही या वस्तीकडे फिरकून पाहिले नाही. सिमेंट रस्त्यांमुळे पावसाळ्यात मोठे संकट निर्माण होईल. त्यामुळे खड्ड्यांच्या रस्त्यावरून चालणे परवडणारे आहे, परंतु सिमेंट रस्ते नको, असे येथील नागरिकांनी सांगितले.

cemnet rod
Chh. Sambhaji Nagar : पाणीसंकटांची मालिका संपेना

नाग नदीच्या काठावर सखल भागात नागरिक राहतात. येथे एक किंवा दुमजली इमारती असून, दरवर्षी पावसाळ्यात घरांत पाणी शिरत असते. मुसळधार पावसात या भागातील रस्त्यांना नाल्याचे स्वरुप येत असल्याचे डी. एन. पात्रीकर यांनी नमुद केले. पावसाळ्यात तुंबलेल्या सिवेज लाईनमुळे अभ्यंकरनगर चौकापासून वस्तीत पाणी साचते. अनेकदा हे घाण पाणी घरांमध्येही शिरत असून, घरांच्या भिंतीला नुकसान पोहोचवित आहे, असे नागरिक म्हणाले. येथील घरांची उंची वाढविणे शक्य नाही. सिमेंट रस्ता, पावसाळी नाल्या तयार झाल्यानंतर त्याचे पाणी घरांमध्ये शिरणार नाही, अशी हमी द्यावी. या भागात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक रहिवासी असून, त्यांना आता नवे घरबांधकाम करणे परवडणारे नाही, असेही नागरिकांनी सांगितले.

cemnet rod
Akola News : ‘ऑक्टोबर हिट’ने अकोलेकर त्रस्त; पारा ३६.९ अंशांवर; गुलाबी थंडीसाठी दोन आठवडे प्रतीक्षाच

काय म्हणतात नागरिक

सद्यस्थितीतील अभ्यंकरनगर ते नाग नदीपर्यंतच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या पावसाळी नाल्याची दुरुस्ती करण्यात यावी.

पावसाळी नाल्यांचे नूतनीकरण करून त्यावर चेंबर आणि झाकणे बसविण्यात यावी.

फूटपाथ तयार करताना ते सद्यस्थितीतील घरांच्या समतल असावे.

अंतर्गत वस्त्यांमध्येही पावसाळी नाल्या तयार करण्यात याव्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com