Nagpur News
Nagpur News Esakal

Nagpur Firing: भोसा घाटावर वाळूमाफियांचा गोळीबार, २५ जणांवर गुन्हे दाखल; महागाव तालुक्यातील घटना

महागाव तालुक्यातील भोसा व आर्णी तालुक्यातील साकूर येथील पैनगंगा नदीपात्रातील दोन वाळूघाटांवर जाण्यासाठी असलेल्या एकाच रस्त्यावरून दोन गटांत हाणामारी होऊन त्याचे पर्यवसान गोळीबारात झाले.

Nagpur Sand Mafiya Firing: महागाव तालुक्यातील भोसा व आर्णी तालुक्यातील साकूर येथील पैनगंगा नदीपात्रातील दोन वाळूघाटांवर जाण्यासाठी असलेल्या एकाच रस्त्यावरून दोन गटांत हाणामारी होऊन त्याचे पर्यवसान गोळीबारात झाले. ही घटना महागाव तालुक्यातील भोसा वाळूघाटावर गुरुवारी (ता. २८) रात्री दहा दरम्यान घडली. पोलिसांनी याप्रकरणी २५ जणांवर गुन्हे नोंदविले असून चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यात वापरलेले दोन जीवंत; तर चार निकामी काडतूस जप्त करण्यात आले आहे.

महागाव तालुक्यातील भोसा आणि आर्णी तालुक्यातील साकूर या दोन पैनगंगा नदीवरील वाळूघाटांवर जाण्यासाठी एकच रस्ता आहे. त्यामुळे वाळू वाहतूक करताना नेहमी वाद होत असे. पुसद येथील अंजुम लाला याने ‘हा रस्ता आर्णी तालुक्यातील साकूर वाळूघाटाचा असून तुमच्या वाळूघाटाचा नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या घाटावरील वाहने महागाव तालुक्यातील भोसा येथून न्या, तुम्ही वाहने या रस्त्यावर चालवू नका’, अशी तंबी देत वीस ते २५ जणांच्या टोळक्याने सुरेश ढाले यांच्याशी रस्त्याच्या कारणावरून वाद उपस्थित केला.

तसेच ढाले व त्यांच्यासोबत असलेल्या युवकांना बेदम मारहाण केली. त्यांच्या दिशेने बेछूट गोळीबार केला. काहींनी गोटमार केली. एक दगड फिर्यादी सुरेश ढाले यांना लागला. त्यांच्या ट्रक व चारचाकी वाहनांची तोडफोड केली, असे तक्रारीत नमूद आहे. त्यांच्या तावडीतून ढाले व इतर युवकांनी पळ काढला असता अंजुम लाला व त्याच्या साथीदारांनी गोटमार करून आपल्याकडील बंदुकीतून गोळीबार करीत २५ राऊंड फायर केले.

तसेच घटनास्थळावर असलेल्या वाहनांची तोडफोड केली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोळीबाराचा आवाज ऐकून साकूर येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बंदुकीतून बेछूट गोळीबार करणाऱ्या टोळक्याने घटनास्थळावरून काढता पाय घेतला. या घटनेची माहिती साकूर येथील नागरिकांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक पियूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखा पुसदचे गजानन गजभारे, महागावचे ठाणेदार सोमनाथ जाधव यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली.

सुरेश ढाले यांच्या फिर्यादीवरून हाणामारीतील २५ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. महागाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करून चार संशयित आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास अप्पर पोलिस अधीक्षक पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड, ठाणेदार सोमनाथ जाधव, सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद सरकटे, गुन्हे शाखेचे पथक करीत आहे.

Nagpur News
Vijay Shivtare : शिवतारे जाणून घेणार कार्यकर्त्यांची मते ; सासवडमध्ये आज बैठक,अपक्ष उमेदवारीबाबत मांडणार भूमिका

शासकीय नियमांना तिलांजली

महागाव तालुक्यातील भोसा येथे शासनाच्या वतीने वाळू डेपो सुरू करण्यात आला आहे. त्याचे कंत्राट देण्यात आले. परंतु सदर कंत्राटदाराला नियमाप्रमाणे वाळू डेपोमध्ये वाळू जमा करून नंतर त्याचा लिलाव करणे गरजेचे असताना वाहने धडक नदी पात्रात नेऊन वाळूघाटावरूनच वाहनांमध्ये वाळू भरली जाते. शासन निर्देशांना तिलांजली देऊन वाळूची वाहतूक केली जाते.

तक्रारीत नऊ जणांची नावे

या प्रकरणाची फिर्याद सुरेश पुंडलीकराव ढाले (वय ४५, रा. शास्त्रीनगर, गोदामफैल, यवतमाळ) यांनी महागाव पोलिस ठाण्यात दिली. त्यांच्या तक्रारीवरून अंजुम लाला, उमेर मिर्झा, समीर खान, शाहरुख, शाहरुख, सोहेल, समीर (रा. सर्व पुसद, जि. यवतमाळ), तर सुलतान व सद्दाम (रा. माहूर, जि. नांदेड) या नऊ जणांविरोधात महागाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Nagpur News
Virat Kohli in IPL: विराट सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत टॉप-5 मध्ये; धोनी-गेललाही टाकलं मागे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com