Women's Day : साठ टक्के मुलींना करावा लागतो ‘बॅड टच’चा सामना

‘वी फॉर चेंज’च्या सर्वेक्षणातील धक्कादायक वास्तव
Women's Day
Women's Dayesakal

नागपूर : साठ टक्के मुलींना कधी ना कधी ‘बॅड टच’चा सामना करावा लागला, ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचा निष्कर्ष ‘वी फॉर चेंज’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात नमूद केला. ११ ते १६ वर्षे वयोगटातील मुलींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे यात म्हटले आहे.

‘वी फॉर चेंज’च्या संस्थापक डॉ. रश्मी पारसकर-सोवनी यांनी वरील दोन गटात हे सर्वेक्षण केले. त्यात १८ ते २५ आणि २५ ते त्यावरील वयाच्या महिलांचा अभ्यास करण्यात आला. १८ ते ६० वयोगटाच्या ६०९ महिलांनी फॉर्म भरले. या अभ्यासात नवतरुणी, तरुणी, मध्यमवयीन महिला ते ज्येष्ठ नागरिक महिलांचा सहभाग आहे.

सर्वेक्षणादरम्यान त्यांच्या असे लक्षात आले की, वयोगट १८ ते २५ गटातील ३९.९ टक्के मुलींनी नकोसा स्पर्श कधी अनुभवला नाही. यावरून ६०.१ मुलींनी असा अनुभव कधी ना कधी घेतला आहे. ११ ते १६ वयोगटात हे प्रमाण सर्वाधिक म्हणजे २६ टक्के आढळून येते. सहा ते २५ वयोगटातील मुलींना बॅड टचचा सामना सर्वाधिक करावा लागला.

(बॅड टच म्हणजे पाण्याचा ग्लास घेताना केलेला ओझरता स्पर्श, बसमधील पुरुषाचा नकोसा स्पर्श, मुलाने जबरदस्तीने हात पकडणे, जबरदस्ती शरीरावरून हात फिरविणे असे स्पर्श येतात.)

भीतीमुळे साधतात डाव

आदरयुक्त भीतीमुळे मुली काही बोलणार नाही, या समजामुळे विकृत पुरुषांचे फावते, असे मत सर्वेक्षणात नोंदवले आहे. जसजसे वय वाढते तसतसे अशा प्रकारच्या पुरुषांची हिंमत वाढते. बॅड टच केल्यास मुलगी चूप बसेल, काही बोलणार नाही, अशा मुली शोधणे त्यांना सहज जमते. घरच्यांनी काही सांगितले तर ते विश्वास ठेवणार नाही, हे मुलीला पटवून देणे त्यांना सहज जमत असावे, असेही सर्वेक्षणात म्हटले आहे.

स्पर्श कुणाकडून (वय १८ ते २५)

अनोळखी : ३९.५ टक्के

शेजारी : १२.२ टक्के

सहप्रवासी : ९.५ टक्के

नातेवाईक : ९.२ टक्के

परिचित : ६.९ टक्के

सहाध्यायी मित्र : २.६ टक्के

वडील, भाऊ : १.७ टक्के

शिक्षक : १.३ टक्के

अनुभव नाही : ३९.२ टक्के

वय वर्षे २५ च्या पुढे

अनोळखी : ३१.८ टक्के

Women's Day
Pregnant Women : गरोदर महिलांना कधीच विचारू नयेत हे प्रश्न

सहप्रवासी : १७.७ टक्के

परिचित : १४.४ टक्के

नातेवाईक : १३.४ टक्के

शेजारी : १०.८ टक्के

शिक्षक : १.६ टक्के

वडील, सख्खा भाऊ : १.३ टक्के

सहाध्यायी मित्र : ०.७ टक्के

अनुभव नाही : ३१.५ टक्के (Women's Day)

Women's Day
Women's Day 2023 : महिला दिनानिमित्त जेऊर येथे 4 मार्च पासुन विविध स्पर्धा; ज्योतीताई पाटील

दंडकारण्यातून फिरताना अनेक महिला भेटल्या. त्या माझ्यापेक्षा सक्षम होत्या. परंतु एक माणूस म्हणून आपली किंमत व्हावी यासाठी त्यांची धडपड सुरू होती. त्यासोबतच विद्यार्थिनींचा संघर्ष मी जवळून पाहिला. महिला, मुलींच्या विविध प्रश्नांतून सहवेदना सर्वेक्षण करण्याचा संकल्प केला. महिलांच्या मागे ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे.

-प्रा. डॉ. रश्मी पारसकर-सोवनी, संस्थापक ‘वी फॉर चेंज’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com