Washim News: वाशीमची राणा-लक्षाची जोडी प्रथम, उमठ्यात दोन दिवसीय शंकरपट; १३२ बैलजोड्या सहभागी

नरखेड तालुक्यातील उमठा येथे नुकतेच दोनदिवसीय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. यात सामान्य गटात वाशीम येथील आतिश वर्मा यांच्या राणा व लक्षा या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला
Washim News
Washim News Esakal

Washim Bullock Cart Race Rana-Lakshya: नरखेड तालुक्यातील उमठा येथे नुकतेच दोनदिवसीय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. यात सामान्य गटात वाशीम येथील आतिश वर्मा यांच्या राणा व लक्षा या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला.

घारपड येथील अशोक पाटील यांच्या बजरंग व बंशी यांनी द्वितीय तर बैतूल (मध्यप्रदेश) येथील मिशू राठोड यांच्या कान्हा व वीरा या बैलजोडीने तृतीय क्रमांक पटकावला. शंकरपटात तब्बल १३२ बैलजोड्या सहभागी झाल्या.

याशिवाय सामान्य गटात ६० बैलजोड्या, तालुका गटात ५० व गाव गटात २२ बैलजोडी अशा एकूण १३२ बैलजोडीने या शंकरपटात सहभाग घेतला होता. तीन गटात हा शंकरपट घेण्यात आला असून, यात सामान्य गट, तालुका गट व गावगट अशा या तिन्ही गटात बक्षिसे देण्यात आली. शंकरपटात महाराष्ट्रसह इतर राज्यातील बैलजोड्या सहभागी झाल्या. तालुका गटात येनीकोणी येथील पवन निंबाळकर यांच्या शंभू व मल्हार प्रथम, उमठा येथील भाऊसाहेब पवार यांच्या रायफल व चिल्या याने द्वितीय तर भायवाडी येथील प्रकाश कुरेकर यांच्या पिंट्या व रॉकेट या बैलजोडीने तृतीय क्रमांक पटकावला. सावरगाव येथील समीर पठाण यांच्या बिट्टी व रफतारने चौथा क्रमांक पटकावला. (Latest Marathi News)

गावगटात उमठा, दातेवाडी, वडविहरा, जामगाव, करणजोली या गावांचा समावेश करण्यात आला. या गटात उमठा येथील प्रमोद पोटपिटे व भोजराज राऊत यांच्या गुरू व डकेत या बैलजोडीने प्रथम, प्रदीप पोटपिते यांच्या शंकर व मारोती द्वितीय तर उमठा येथील प्रमोद चौधरी यांच्या लाख्या व जेबकट या बैलजोडीने तृतीय क्रमांक पटकावला. शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.

Washim News
Moral Code Of Conduct: आचारसंहिता म्हणजे काय रे भाऊ? पाच मुद्द्यांत जाणून घ्या प्रकरण

रूपेश पवार यांनी या शंकरपटाचे आयोजन केले. सामान्य गटात पाहिले बक्षीस ४१ हजार, द्वितीय ३१ हजार, तृतीय २१ अशी १७ बक्षिसे तर तालुका गटात पाहिले बक्षीस २१ हजार, द्वितीय १५ हजार, तृतीय ११ हजार अशी १९ बक्षिसे देण्यात आली. गावगटात पाच बक्षिसांचा समावेश होता. माजी आमदार डॉ. आशिष देशमुख व काटोल विधानसभा प्रमुख चरणसिंग ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. (Latest Marathi News)

जिल्हा नियोजन समिती अविनाश ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य प्रीतम कवरे, महामंत्री भाजप कुलदीप हिवरकर, माजी सभापती जिल्हा परिषद नागपूर उकेश चव्हाण, महामंत्री नागपूर जिल्हा ग्रामीण दिलेश ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य समीर उमप, दिलेश ठाकरे, संदीप सरोदे, सतीश रेवतकर, रूपा देशमुख, प्रकाश घोरपडे, नितीन धोटे, शरद जुडपे, प्रमोद पेठे, भाऊसाहेब पवार, मनोज वर्मा, अर्जुन ढेगरे, किशोर गाढवे, गोपाल ठाकरे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजनासाठी प्रदीप पोटपिटे, रितेश ठाकरे, शिवा पवार, नरेश पांडे, केशव पोटपिटे आदींनी सहकार्य केले.

Washim News
Cabinet Meeting : राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 17 महत्त्वाचे निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com