Accident News | ‘ओव्हरटेक’चा प्रयत्न नवदाम्पत्याच्या जिवावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident Death

‘ओव्हरटेक’चा प्रयत्न नवदाम्पत्याच्या जिवावर

गुमगाव : अवघ्या एक दिवसांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. लग्नात एकमेकांच्या गळ्यात हार घालताना त्यांनी भावी सुखी संसाराची स्वप्न रंगवली होती. नव्याने आयुष्य ती दोघंही जगण्यास सुरुवात करत होती. सगळं चांगलं होत असतानाच नियतीने असा काही खेळ मांडला की सारेच उद्ध्वस्त झाले. हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथील हिमांशू राऊत आणि निकिता राऊत या नवविवाहीत जोडप्याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला.

हेही वाचा: २०२३ मध्ये जीडीपी ८ ते ८.५ टक्के राहील - अर्थमंत्री सितारामन

गुमगाव येथील हिमांशू देवानंद राऊत (वय२२) पत्नीसह निकिता हिमांशू राऊत (वय२१) नव्याने घेतलेल्या दुचाकीने नागपूर-चंद्रपूरमार्गे जात असता ‘ओव्हरटेक’ करण्याच्या नादात समोरून येत असलेल्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. यात दोघेही पती-पत्नी गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना २९ जानेवारी रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास बुटीबोरी पोलिस हद्दीतील जलसा ढाबा ते दानापाणी ढाब्याजवळील परिसरात घडली.

हिमांशू आणि निकिता यांचे नुकतेच एक महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. घटनेच्या दिवशी दोघेही काही कामानिमित्त दुचाकीने तारसी येथे जाण्यास निघाले, अशी माहिती आहे. रुईखैरी शिवारातील हैद्राबाद-नागपूर मार्गाच्या दुरुस्तीचे कार्य सुरू असल्यामुळे नागपूर हैद्राबाद या मार्गाने एकतर्फा वाहतूक सुरू होती.

हेही वाचा: उत्पल पर्रीकरांबद्दलचा 'तो' शब्द सेनेनं पाळला; राऊतांनी दिली माहिती

दरम्यान दुपारी साडे चारच्या सुमारास हिमांशू आणि निकिता हे दुचाकीने मार्गावरील जलसा ढाबानजीक पोहचल्यावर हिमांशूने पुढील वाहनास ‘ओव्हरटेक’ करण्याचा प्रयत्न केला असता समोरून एक ट्रेलर दिसल्याने हिमांशूचे दुचाकीवरील संतुलन बिघडले. ट्रेलर चालकाने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात आपल्या ताब्यातील ट्रेलर हे रस्त्याच्या दुभाजकावर चढविले, मात्र त्याला यश आले नाही. हिमांशूच्या दुचाकीची गती तीव्र असल्यामुळे होणाऱ्या घटनेला आवर घालता आला नाही. त्यामुळे दुचाकी ही ट्रेलरला जाऊन धडकली. त्यात ते दोघेही गंभीररित्या जखमी झाले.

हेही वाचा: वयाने १६ वर्षांनी लहान अभिनेत्रीला हृतिक करतोय डेट? हातात हात घालून दिसले एकत्र

रस्ता दुरुस्तीचे काम बघणाऱ्या ओरिएंटल कंपनीच्या टोल प्लाझावरील मेडिकल टीमने घटनास्थळाकडे धाव घेऊन जखमींना घेऊन बुटीबोरी येथील खासगी रुग्णालय गाठले आणि बुटीबोरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. डॉक्टरांनी हिमांशूला तपासून मृत घोषित केले, तर निकिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुटीबोरीचे पोलिस निरीक्षक भिमाजी पाटील यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरिता रवाना करून घटनेची नोंद करण्यात आली.पुढील तपास बुटीबोरी पोलिस करीत आहेत.

हेही वाचा: स्मशानात अंत्यसंस्काराची तयारी, दवंडी अन् स्वच्छताही, बेबाबाईंचा संघर्षमयी प्रवास

अवघ्या एक महिन्याचा संसार

गुमगाव निवासी हिमांशू हा डेकोरेशनच्या कामावर जाणे, आठवडी बाजारात भाजीपाला विकण्यासह मिळेल ते रोजंदारीचे काम करीत होता. हिमांशूचे आई-वडील शेतमजूर असून तो घरात सर्वात मोठा होता. त्याचे नुकतेच एक महिन्यापूर्वी लग्न झाले होते. लग्नाच्या दोन-तीन दिवसानंतरच त्याने नवीन दुचाकी खरेदी केली होती आणि त्याच दुचाकीने पत्नीला घेऊन बोरखेडी नजीकच्या तारसी येथील आत्याच्या मुलीला भेटायला जात असता हा अपघात झाला.लग्नाच्या अवघ्या एक महिन्यामध्येच या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

Web Title: Newlyweds Attempts To Overtake Just A Month Marriage Accident Death

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top