Nitin Gadkari : सर्वांना सत्ताधारी पक्षांचे अनुयायी होण्याचे वेध, विचारांशी प्रामाणिक राहणे शिकले पाहिजे : गडकरी

Nitin Gadkari Speaks on Political Loyalty and Ideology : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सत्ताधारी पक्षाचे अनुयायी होण्यापेक्षा आपल्या विचारांशी प्रामाणिक राहण्याची गरज व्यक्त केली.
Nitin Gadkari

Nitin Gadkari

esakal

Updated on

नागपूर : अलीकडे जो-तो सत्तारुढ पक्षात शिरतो. ‘तो’ का आला हे कळत नाही आणि का गेला हेही कळायला मार्ग नाही. पक्षाचे, विचारांचे कुणाला अनुयायी होण्यात रस नाही. प्रत्येकाला सत्ताधारी पक्षाचे अनुयायी होण्याचेच वेध लागले आहेत, मात्र विचारांशी प्रामाणिक राहणे शिकले पाहिजे, असे परखड मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे व्यक्त केले.

माजी केंद्रीय मंत्री वसंतराव साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘वसंत स्मृती’ या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महालातील निवासस्थानी रविवारी (ता. २०) झाले. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गडकरी बोलत होते.

Nitin Gadkari
MSRTC Volvo Bus: एसटीचा प्रवास आता ‘व्होल्वो’मय! २०० एसी बस ताफ्यात येणार; शयनयान बससह मोबाइलवरून तिकीट बुकिंग

या ग्रंथाचे मुख्य संपादक प्रभाकर दुपारे, संपादक डॉ. उदय बोधनकर आणि सहसंपादक सुनीती बोधनकर उपस्थित होते. गडकरी म्हणाले, वसंतराव साठे, ए. बी. बर्धन यांच्यासारखे दिग्गज नेते त्यांच्या विचारांशी एकनिष्ठ होते. वसंतराव साठे यांची इंदिरानिष्ठ म्हणून ओळख होती. स्पष्ट बोलणे आणि विचारांशी निष्ठा ही त्यांची वैशिष्ट्ये होती. त्याचा त्यांना लाभ झाला आणि नुकसानही झाले.

मात्र, विचारांशी तडजोड करून बेरजेचे राजकारण करण्याच्या भानगडीत ते पडले नाही. बर्धन, साठे यांच्यासारख्या नेत्यांपासून विचारांशी प्रामाणिक राहणे शिकले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक प्रभाकर दुपारे यांनी केले. भारतीय जनता पक्षात गर्दी भारतीय जनता पक्षात इतकी गर्दी झाली तरी लोक नव्याने येतच आहेत.

Nitin Gadkari
Pune Weather: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! उकाड्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता; पुढील दोन ते तीन दिवसांचा अंदाज

जुने लोक विचारतात, आम्ही कुठे जायचे, तर त्यांना उत्तर दिले, की बाहेर जा आता, असेही गडकरी यावेळी बोलताना म्हणाले. विदर्भातील नेते बरोबर नाही म्हणून विदर्भ मागासलेला आहे. जनता तशी आहे, म्हणून कार्यकर्ते आणि नेते तसे आहेत.

‘एक पाव डटाव, गरीबी हटाव’ असे म्हणत जनतेने मतदान केले की त्यांना नेतेही तसेच मिळणार. जनता चांगल्या लोकांच्या मागे उभी राहिली तर चांगले नेते मिळतील. विदर्भातील नेतृत्वाचा विकास चांगला झाला पाहिजे, त्याशिवाय विदर्भाचे मागासलेपण संपणार नाही, असे मी साठे यांनी म्हणत असे, असे सांगत गडकरी यांना साठे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com