कोरोनामुळे सोशल मीडियातून भारतीय उत्पादकांना आत्मनिर्भर होण्याची संधी

Opportunity for Indian producers to become self-reliant
Opportunity for Indian producers to become self-reliant

नागपूर : चीनच्या अलीबाबा डॉट कॉम या ऑनलाईन शॉपिंग कंपनीचे भारतीयांना आकर्षण आहे. ते मोडित काढण्यासाठी भारतीय उत्पादक व सेवापुरवठादारांनी ई-कॉमर्सचे धडे घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर अवलंबून असलेल्या तरुणाईला हवे ते "ऑनलाईन' देण्याची तयारी ठेऊन भारतीय उत्पादक व सेवापुरवठादारांना आत्मनिर्भर होण्याची संधी आहे. भारतीय परंपरागत व्यवसाय करणाऱ्या बारा बलुतेदारांना एका ऑनलाईन व्यासपीठावर आणण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांतून काहींनी तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. 

तरुणाईला मोठ्या प्रमाणात "ऑनलाईन शॉपिंग'चे वेड आहे. चीनची "अलिबाबा डॉट कॉम' ही ऑनलाईन कंपनी अगदी अगरबत्तीपासून सर्वच भारतीय ग्राहकांना ऑनलाईन उपलब्ध करून देत असून, खोऱ्याने पैसा ओढत आहे. कोरोनाच्या प्रसारानंतर चीनची उद्योगाच्या क्षेत्रातील मक्तोदारी मोडित काढण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरू आहे. यात भारतीय सेवापुरवठादार, उत्पादकांनाही मोठी संधी आहे. केवळ अलिबाबा डॉट कॉमच नव्हे तर ऍमेझॉनसारख्या विदेशी कंपन्यांच्या तावडीत सापडलेला भारतीय ग्राहक आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भारतीय उत्पादकांनी पाऊले उचलण्याची गरज सोशल मीडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - होम क्वॉरान्टाईनचा शिक्‍का असलेल्या व्यक्‍तीचा रस्त्यावर तडफडून मृत्यू

या कंपन्यांनी भारतीय स्वदेशी कंपन्यांचे कंबरडे मोडले. मात्र, आता याच स्वदेशी कंपन्या, उत्पादक, सेवापुरवठादारांना ई-कॉमर्सच्या क्षेत्रात भरारी घेण्याची संधी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उपलब्ध झाली आहे. बारा बलुतेदार, हंगामी उत्पादक, कृषी उत्पादक, ग्रामीणमधील सेवापुरवठादार, परंपरेने व्यवसाय करणारे संघटित, असंघटित उत्पादक, लहान मोठे दुकानदार यांना एका ऑनलाईन शॉपिंग अर्थात ई-कॉमर्सच्या व्यासपीठावर आणण्यासाठी पुढाकार घेण्याच्या आवश्‍यकतेवर पारसे यांनी भर दिला. 

नुकतेच केंद्र सरकारने उद्योगासाठी योजनांची घोषणा केली. त्याचा लाभ घेत स्वदेशी उत्पादनांना जगभर पोहोचविण्याची संधी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वदेशी कंत्राटदारांकडूनच मुंबई-पुणे महामार्ग तयार केला. हे स्वदेशीचे उत्तम उदाहरण आहे. सोशल मीडियावरील तरुणाई मोठा ग्राहक असून, स्वदेशीला बळ तसेच विदेशी कंपन्यांसह उत्पादनांचेही आकर्षण संपुष्टात आणण्याची दुहेरी संधी भारतीय उत्पादक, सेवापुरवठादारांसाठी निर्माण झाल्याचे चित्र आहे. 

सोशल मीडिया भारतीय उद्योगासाठी ब्रम्हास्त्र 
देशातील तरुणाईला एका क्‍लिकवर हवे ते पाहिजे आहे. सोशल मीडियात गुंतलेली ही तरुणाई उत्तम सेवा, उत्पादने मिळाल्यास स्वदेशी ऑनलाईन कंपन्यांना डोक्‍यावर घेईल. सोशल मीडिया भारतीय लघु, मध्यम उद्योगासाठी ब्रम्हास्त्र आहे. त्याचा अचूक वापर केल्यास अलिबाब डॉट कॉम किंवा ऍमेझॉनसारख्या विदेशी कंपन्यांना गाशा गुंडाळण्यास वेळ लागणार नाही. 
- अजित पारसे, 
सोशल मिडिया विश्‍लेषक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com