esakal | कोरोना चाचणीसाठी 'खासगी'त दुप्पट शुल्क, रुग्णांची लूट होत असतानाही कारवाई नाहीच

बोलून बातमी शोधा

corona test
कोरोना चाचणीसाठी 'खासगी'त दुप्पट शुल्क, रुग्णांची लूट होत असतानाही कारवाई नाहीच
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनामुळे त्रस्त झालेल्या रुग्णाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न खासगी लॅबचे संचालक करीत आहेत, तर खासगी लॅबमधील नफेखोरीवर चाप बसविण्यासाठी राज्य सरकारने चाचणीचे दर निश्चित केले आहेत. मात्र, चाचण्यांच्या नावाखाली संशयित रुग्णांकडून लूट होत असल्याची माहिती पुढे आली आहे. पाचशे रुपये चाचणीचे शुल्क ठरविण्यात आल्यानंतरही एक हजार रुपये वसूल करण्यात येत आहे.

हेही वाचा: सावधान! 'या' शहरात फक्त एक नव्हे तर ५ नवीन स्ट्रेन, लक्षणात बदल

कोरोनाचा प्रादुर्भाव एखाद्या व्यक्तीला झालेला आहे की नाही हे तपासण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते. प्रारंभीचा दर अडीच हजारांवर होता. काही महिन्यापूर्वी केंद्र शासनाने शुल्क कमी केले. यानंतर राज्य सरकारने यात पुन्हा एकदा कपात केली आहे. आता या चाचणीचे ५०० रुपये शुल्क आकारण्याचे आदेश आहेत. आरटीपीसीआर, अँटीबॉडी आणि रॅपिड अँटीजेन चाचण्यांसाठीच्या दरात राज्य सरकारने कपात केल्यानंतरही कोरोना संशयितांची तसेच कोरोना झाल्यानंतर काही दिवसात तपासल्या जाणाऱ्या अँन्टिबॉडीज तपासणी लूट करण्यात येत आहे. नुकतेच उमरेड येथील एका व्यक्तीकडून १ हजार रुपये शुल्क आकारण्यात आले. प्रत्येक पॅथॉलॉजीमध्ये या चाचण्यांचे वेगवेगळे दर आहेत. यामुळे रुग्णामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

हेही वाचा: 'नागरिकांनो! RTPCR चाचणी निगेटिव्ह आल्यास पाचव्या दिवशी करा HRCT'

या संभ्रमाचा लाभ घेत रुग्णांना लुटण्यात येत आहे. या प्रकरणाच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे पोहोचल्या आहेत. मात्र, या तक्रारींची दखल घेण्यात येत नसल्याची तक्रार समता सैनिक दलाचे कार्यकर्ते अनिकेत कुत्तरमारे यांनी केली आहे.

आरटी-पीसीआरचे दर -

  • प्रयोगशाळेत जाऊन चाचणी करण्यासाठी - ५०० रुपये

  • हॉस्पिटल, कोविड केअर सेंटरमधील तपासणीसाठी - ६०० रुपये

  • रुग्णाच्या घरी नमुना घेण्यासाठी येऊन चाचणीसाठी -८०० रुपये

हेही वाचा: स्वप्नांची सफर घडविणाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ; टूर ऑपरेटर्स विकताहेत आंबे आणि भाजीपाला

रॅपिड अँटीजेन चाचणीचे दर

  • प्रयोगशाळेत जाऊन चाचणी करण्यासाठी - १५० रुपये

  • कोविड केंद्रातून नमुने घेतल्यानंतर तपासणीसाठी - २०० रुपये

  • घरी जाऊन नमुना घेतल्यानंतर तपासणीसाठी - ३०० रुपये

अँटीबॉडीज चाचणीचे दर

  • प्रयोगशाळेत जाऊन तपासणी करण्यासाठी - २५० रुपये

  • कोविड केअर सेंटर, हॉस्पिटलमध्ये नमुने घेण्यासाठी गेल्यानंतर- ३०० रुपये

  • रुग्णाच्या घरी जाऊन नमुना घेतल्यानंतर तपासणीसाठी -४०० रुपये