ग्रामीण भागातील शाळांची घंटा आजपासून, फक्त २४ हजार पालकांचे संमतीपत्र

schools in rural area starts from today in nagpur
schools in rural area starts from today in nagpur
Updated on

नागपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील नववी ते बारावीच्या ६५७ शाळा आज सोमवारपासून (ता.१४) सुरू होत आहेत. मात्र, शाळांमध्ये उपस्थितीसाठी शिक्षकांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. ८० टक्के शिक्षकांचा चाचणी अहवाल आला असून यातील ३८ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. अद्याप २० टक्के शिक्षकांच्या चाचणीचे अहवाल यायचे आहेत. शाळा सुरू करण्यासाठी २४ हजार ३३८ पालकांनी संमतिपत्र दिले. काही पालकांनी संमती पत्र न देता एक प्रकारे नकारच दर्शविल्याचे दिसते. 

महानगरपालिकेद्वारे ३ जानेवारीपर्यंत स्वतःच्या हद्दीतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, ग्रामीण भागातील शाळा १४ तारखेपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्ह्यातील ६५७ शाळांमध्ये १ लाख ३० हजार ५७८ विद्यार्थी असून ५ हजार ७७९ शिक्षक आहेत. या सर्व शिक्षकांना नव्याने कोरोना चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यापैकी ८० टक्के शिक्षकांच्या चाचणीचे अहवाल आले. त्यात ३८ शिक्षक पॉझिटिव्ह आलेत. या सर्व शिक्षकांना शाळेत जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे कोरोनासंदर्भात करावयाच्या उपाययोजनांअंतर्गत शाळांना सुरू करण्यापूर्वी पल्सऑक्सिमिटर, सॅनिटायझर, सोडिअम हायपोक्लोराईड सोल्यूशन आदी आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकाला झुम अ‌ॅपच्या माध्यमातून सूचना दिल्याचे शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी सांगितले. 

६० हजारावर विद्यार्थी शहरातीलच - 
शहरातील शाळा ३ जानेवारीपर्यंत बंद आहेत. मात्र, शहरालगत असलेल्या बेसा, बेलतरोडी, हिंगणा, वाडी, पाचगाव, कापसी महालगाव, कळमेश्वर आणि इतर लगतच्या भागात बऱ्याच नामवंत सीबीएसई शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये शहरातील ६० हजारावर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील शाळा सुरू असल्याने या विद्यार्थ्यांना त्या-त्या शाळेत जावेच लागणार आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, बऱ्याच पालकांनी विद्यार्थ्यांना न पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. 

  • ग्रामीण भागातील शाळा : ६५७ 
  • विद्यार्थी : १ लाख ३० हजार ४५४ 
  • शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी : ९ हजार १४७ 

शाळांचे निर्जंतुकीकरण, थर्मल गनचे वाटप - 
जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागामध्ये सुरू होत असलेल्या शाळांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण केले. प्रत्येक शाळेला विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गन, सॅनिटायझर, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भित्तीपत्रके आदी वितरित करण्यात आलीत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com