Dindi: एका लग्नाची गोष्ट! शुभमच्या लग्नात बॅन्डबाजा नव्हे, निघाली दिंडीसह वरात

Varat: या आगळ्या-वेगळ्या पध्दतीने लग्नाची वरात काढल्याने या विवाहाची चर्चा होत आहे. या सोहळ्यात नावीण्य असल्यामुळे बघ्यांची गर्दी जमली होती.
Marriage Varat
Marriage VaratEsakal

सध्या लग्नाचा धुमधुडाका सुरु आहे. यंदा मुर्हूत कमी असल्याने एकाच दिवशी अनेक ठिकाणी विवाहाचा बार उडत असल्याचे चित्र आहे. विवाह सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण. हा सोहळा आता केवळ विधीपुरताच मर्यादीत राहीला नसून लग्नाकडे ‘ग्लॅमरस इव्हेंट’ म्हणून पाहिले जात आहे.

माझे कुटुंब वारकरी सप्रंदायाचे असून त्याचा माझ्यावर प्रभाव आहे. आता ‘गॅल्मर’ च्या युगात लग्न सोहळ्यात महागडा बॅन्ड, डीजे, ढोल सांगून ध्वनीप्रदूषनासह अश्लील नृत्यांचा समावेश वाढतीवर आहे. यावर आळा बसावा. धार्मिकतेचे जतन व्हावे, हा उद्देश समोर ठेवून लग्न वरातीत वारकरी दिंडीला मी प्राधान्य दिले.
-शुभम बावनकर, नवरदेव, नांदागोमुख, ता.सावनेर

हा ‘इव्हेंट’ खास व्हावा, यासाठी वर-वधूकडील मंडळी प्रयत्नशील असतात. अश्यातच याच विवाह सोहळ्याला अविसमरणीय करण्यासाठी नांदागोमुख येथील शुभम बावनकर याने स्वतःच्या लग्नसोहळ्यात चक्क वारकरी सप्रंदायातील दिंडीच्या माध्यमातून भजन, कीर्तनासह हरीनामाच्या गजर करत अभूतपूर्व वरात काढून नवीन पिढीला आपली धार्मिक संस्कृती टिकवण्याचा आदर्श दिला.

Marriage Varat
Couple: तोतया नव्हे तर खऱ्या पोलिसांनीच लुटले प्रेमीयुगुलाला, वाठोडामध्ये गुन्हा दाखल

लग्न म्हणजे प्रापंचिक जीवनाची सुरुवात. विवाह सोहळ्यातून एक जोश आणि उत्साह निर्माण होतो. संगीत असल्याशिवाय कोणताही सोहळा पूर्ण होऊ शकत नाही. पूर्वी विवाहात पांरपरिक वाद्यांचा सहभाग असायचा. यामध्ये ढोल, नगारे, सनई-चौघडा, ताशा, सबंळ, हलगी, डफ, बॅन्ड पथकांचा समावेश करण्यात येत होता. कालातरांने डीजे, ऑकेस्ट्रा, महागडी बॅन्ड पार्टी, पंजाबी ढोल अश्या वाद्यांचाही समावेश हळूहळू वाढू लागला. या वाद्यांच्या धुनवर वराती थिरकून लग्न सोहळ्याचा आंनद लुटत. मात्र सर्व वाद्यांना बगल देत केळवद येथे बावनकर-बांगडे कुटुबांचा विवाह पार पडला.

Marriage Varat
Thumb Transplant: तुटलेल्या अंगठ्याचे प्रत्यारोपण, मध्यप्रदेशातील तरुणाचे अपंगत्व टळले

या समारंभात नांदागोमुख येथील नवरदेव शुभम बावनकर या तरुणाने विवाहात वारकरी सांप्रदायिक दिंडीचा समावेश करुन लग्नाची वरात काढली. वारकरी दिंडीच्या माध्यमातून कीर्तनकारांच्या भक्तीमय भजन गायनासोबत हरीनामाचा गजर करीत वरातीला धार्मिकतेची जोड दिली. यातून या कुटुंबाने एक नवा आदर्श निर्माण केला. या आगळ्या-वेगळ्या पध्दतीने लग्नाची वरात काढल्याने या विवाहाची चर्चा होत आहे. या सोहळ्यात नावीण्य असल्यामुळे बघ्यांची गर्दी जमली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com