esakal | विद्यार्थ्यांनो! उन्हाळी परीक्षा २४ मे पासून, फक्त एकाच सत्राचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

exam

विद्यार्थ्यांनो! उन्हाळी परीक्षा २४ मे पासून, फक्त एकाच सत्राचा समावेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा सध्या सुरू आहे. कोरोनामुळे विद्यापीठाच्या परीक्षा लांबल्या. त्यामुळे अ‌ॅकेडमिक कॅलेंडर कोलमडले. मात्र, विद्यापीठाने त्यातून सावरत अ‌ॅकेडमिक कॅलेंडरनुसार अंतिम सत्राच्या उन्हाळी परीक्षा २४ मे पासून घेण्याचे ठरविले आहे.

विद्यापीठाद्वारे २५ मार्चपासून उन्हाळी परीक्षा घेण्यास सुरुवात करण्यात आली. आजपासून या परीक्षेतील तिसऱ्या टप्प्याच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. मात्र, विद्यापीठाच्या अ‌ॅकेडमिक कॅलेंडरनुसार उन्हाळी परीक्षेला सुरुवात करणे अपेक्षित होते. कोरोनामुळे त्या परीक्षा विद्यापीठाला घेता आल्या नाहीत. मे महिन्यास साधारणतः विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या उन्हाळी परीक्षा घेण्यास सुरुवात होत असते. गेल्यावर्षी कोरोनामुळे त्या ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आल्यात. आता यावर्षी विद्यापीठाद्वारे २४ मे पासून या परीक्षा विद्यापीठाद्वारे घेण्यात येणार आहे. त्यात सर्वच अंतिम सत्राच्या परीक्षांचा समावेश करण्यात आला आहे. या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यायच्या की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याचे समजते.

हेही वाचा - 'कुंभमेळ्याहून परतणाऱ्या भाविकांनी कोरोना चाचणी करावी'

पदव्युत्तर आणि प्रथम वर्षाचाही समावेश!

विद्यापीठाद्वारे हिवाळी परीक्षेमध्ये सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा महाविद्यालयस्तरावर घेण्याचे ठरले. मात्र, महाविद्यालयस्तरावर परीक्षा होत असताना मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यापीठाद्वारे उन्हाळी परीक्षा विद्यापीठस्तरावर घेण्याचा विचार सुरू आहे. याशिवाय प्रथम वर्षाचाही परीक्षा विद्यापीठस्तरावर होण्याती शक्यता आहे. मात्र, या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठ ऑनलाइन वा ऑफलाइन पर्याय निवडते, यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

हेही वाचा - कुख्यात गुंडाच्या तब्बल सात शाळा, गुन्हेगारीच्या पैशातून उघडल्या शिक्षण संस्था

१० मे पर्यंत संपणार हिवाळी परीक्षा -

विद्यापीठाद्वारे २५ मार्चपासून घेण्यात येणाऱ्या हिवाळी परीक्षा १० मे पर्यंत संपणार आहेत. सध्या परीक्षेचा तिसऱा टप्पा सुरू आहे. त्यात ४२ परीक्षांचा समावेश आहे. पूर्वी पहिल्या टप्प्यात ४८, दुसऱ्या टप्प्यात ४६ परीक्षा घेण्यात आल्यात. आता चौथा टप्पा २६ एप्रिल तर त्यानंतर पाचवा टप्पा सुरू करण्यात येणार आहे.

loading image